राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वरात आगमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आज नुकतेच आगमन झाले. महाबळेश्वर येथे आगमन होताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने राज्यपालांचे स्वागत केले.

याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल श्री. बैस यांचे स्वागत केले.

राज्यपाल महोदय हे शनिवार दि. 25 मे 2024 पर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी ६ वाजता आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रामबाई बैस यांचेही आगमन झाले. राजभवन येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या गिरिदर्शन या बंगल्यामध्ये ते मुक्कामी राहणार असून या दौऱ्यात ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरासह बेल एअर रुग्णालय तसेच प्रेक्षणीय स्थळांनाही ते भेटी देणार आहेत.

दि. 22 मे रोजी दुपारी 3 वाजता राजभवन महाबळेश्वर येथे राज्यपाल बैस हे इंडियन रेडक्रॉस सोसायटी स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेणार आहेत. दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे रुग्णालयाची पहाणी. सायंकाळी 5.10 राजभवन येथे आगमन व राखीव असणार आहे.

दि. 23 मे रोजी सकाळी 10.15 वाजता श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर येथे आगमन व दर्शन पूजेसाठी राखीव. 11.15 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अधिकाऱ्यांशी बैठक. दुपारी 3.30 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा. दि. 24 मे रोजी दुपारी 2.30 वाजता मधाचे गाव मांघर ता. महाबळेश्वर येथे आगमन व पहाणी. दुपारी 3.10 वाजता राजभवाकडे मोटारीने प्रयाण. त्यानंतर दि. 25 मे रोजी दुपारी 12 वाजता राजभवन येथून मोटारीने पाचगणीकडे प्रयाण. 12.30 न्यु ईरा हायस्कूल पाचगणी येथे आगमन व हेलीकॉप्टरने राजभवन मुंबईकडे प्रयाण, असा राज्यपालांचा दौरा आहे.