कराड प्रतिनिधी । महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कराडच्या कृषि महाविद्यालयातील कृषीदूतांचे सुपने येथे नुकतेच आगमन झाले. यावेळी गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी व तरुण कार्यकर्ते यांच्याद्वारे गावात स्वागत करण्यात आले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या अभ्यासकाप्रमाणे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक संलग्नता उपक्रम-२०२४-२५ साठी कराड कृषि महाविद्यालयातील कृषिदूतांकडून गावोवागी जाऊन अभ्यास केला जात आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील सुपने गावात महाविद्यालयातील ऋषिकेश धोरण, प्रणित ननवरे, रोहन पवार, अजय पवार, रजनीकांत बनसोडे, योगेश भारमल, आकाश जाधव हे कृषिदुत दाखल झाले.
यावेळी सुपने गावातील सरपंच जयवंत पाटील, तलाठी व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. सुपणे गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी रा. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल अडांगळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हसुरे यांचे कृषी कृषीदूतांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.