लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज; 6 हजार 50 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सातारा लोकसभा निवडणुक २०२४ साठीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिसांनी सुमारे ६ हजार ५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून परवानाप्राप्त ३ हजार २२८ अग्नीशास्त्रांपैकी १ हजार ९६२ अग्निशाख पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात संवेदनशील अठरा क्षेत्र असून प्रत्यक्ष २१ मार्गावर पोलिसांनी रूट मार्च केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे. काही महत्त्वाच्या प्रक्रिया पोलिसांनी सुरू केल्या आहेत. १३९७ फरार आरोपींपैकी १३४२ आरोपींचा शोध सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ५५ आरोपींना शोधण्यात यश आले आहे. २०२४ मध्ये १०९७ अजामीन वॉरंट मंजूर असून ४९८ वॉरंट बजावण्यात आलेले आहेत. ४९२ वॉरंट बजावण्याचे काम सुरू आहे. मतदारांना दारू पैसे भेटवस्तू इतर अनुषंगिक कारवायांच्या संदर्भात सातारा पोलीस कारवाई करत आहे. यामध्ये ३३८६० रुपयाची रोकड पाच हजार ३१ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भात २४ लाख ८८ हजार ५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात आचारसंहितेचा पार्श्वभूमीवर ६०५० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात पोलिसांनी आचारसंहिता भंगाची प्रकरणे हाताळण्यासाठी आरोपींपैकी ३५ भरारी पथके तैनात करण्यात आलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने ३२२८ परवाना प्राप्त अग्नीशास्त्रांपैकी १९६२ अग्नीशख जमा करून घेण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याच्या बजावण्याचे हद्दीत १८ संवेदनशील क्षेत्र आहेत. यामध्ये २१ मार्गावर रूट मार्च करण्यात आला असून चार ठिकाणी फ्लॅग मार्च झाल्याची त्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत २४ कोबिंग ऑपरेशन वेळा नाकाबंदी करण्यात आली.

सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे, तसेच सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर १७ ठिकाणी चेक पोस्ट भरण्यात आले असून तेथे सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामासाठी एक बीएसएफ एक सीआरपीएफ तसेच एक होमगार्डची तुकडी ज्यादा तैनात करण्यात आल्याचे समीर शेख यांनी सांगितले.