माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये वारीतील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार घडला.

फलटण मधून सकाळी माऊलींची पालखी बरडच्या दिशेने मुक्कामासाठी जात असते. जाताना विडणी येथे पहिला विसावा असतो. यावेळी पालखीतील वाहने पुढे जाणे अपेक्षित आहे. पुढे जाऊन दिंडीतील वारकऱ्यांना नाष्टा केला जातो. परंतु पोलिसांच्या हलगर्जीमुळे ट्राफिक वाहने काही काळ तसेच दाबून ठेवण्यात आले त्यामुळे दिंडीतील काही चालकांनी विश्वस्तांना कल्पना दिल्यानंतर विश्वस्त स्वतः टॉपिक नियंत्रण करू लागले.

माऊलींच्या पालखी रथ सकाळी नाना पाटील चौकातून ०८: ३६ मिनिटांने बरडच्या दिशेला मार्गस्थ झाला. आळंदी संस्थांच्या झालेल्या मीटिंगमध्ये संस्थांकडून दिलेले सूचना यांचे पालन पोलिसांकडून होत नसल्याने आळंदी संस्था कमिटी कडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार (आरफळकर) रस्त्यावर उतरले होते.