सातारा प्रतिनिधी | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम १२ पोट जातीतील दारिद्र रेषेखालील व गरजू, घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना आर्थिक स्वयरोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळाची शासनाने स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल भि. वायदंडे यांनी केले आहे.
महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी, मादिंग, दानखणी मांग, मांगगारोडी, मांग महाशी, मदारी, मांग गारोडी राधेमांग, मादगी व मादिगा या समाजातील आर्थिक उन्नतीसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ [मर्या] मुंबई व राष्ट्रीय अनुसूचित जातीवित विकास महामंडळ नवी दिल्ली यांचे मार्फत विविध व्यवसायकरिता सुविधा कर्ज योजना कर्ज मर्यादा रक्कम रु.५ लाख लघुऋण वित योजना कर्जमर्यादा रुपये १.४० लाख, महिला समृद्धी योजना कर्जमर्यादा रक्कम रुपये १.४० लाख व शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा
देशाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी रक्कम ३० लाख व परदेशातील अभ्यासक्रमासाठी रक्कम रु.४० लाख या प्रमाणे योजना सुरु करण्यात आली सून त्यानुसार जिल्हा कार्यालयात उद्धिष्ट प्राप्त झालेले आहे. सदर योजनांची माहिती महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
अर्जदारांना येणाऱ्या अडीअडचणीचा विचार करून महामंडळामार्फत वेबसाईट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जातीवित्त विकास महामंडळ, विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://betasladc.org ह्या वेबसाईट प्रणालीवर पोर्टल द्वारे सादर करावेत. असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विठ्ठल भि. वायदंडे यांनी केले आहे.