राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक कलाकार मानधन सन्मान योजना नोंदणी करण्याचे आवाहन

0
104
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील मान्यवर जेष्ठ साहित्यिक व प्रयोगात्मक कलामध्ये पुर्णवेळ चरितार्थ अवलंबून असलेले कलाकार यांना राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत मानधन देण्यात येणार आहे. तरी कलाकरांनी लाभार्थ्यांनी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या लिंकवर पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग अंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी केले आहे.

सदर योजनेसाठी पात्रतेचे निकष अटी व शर्तीबाबत महत्वाची माहिती देखील देण्यात आली असून त्यामध्ये ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे, दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथील करण्यांत येत आहे. (दिव्यांगांना वयोमर्यादा ४० वर्षे) ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे. वयाने जेष्ठ असणारे, विधवा/परितक्ता ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते. मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासीक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार.कलाकार / साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

पात्र असलेल्या कलाकारांनी अर्जासोबत वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती व पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास), बँक तपशील, अपंगत्व दाखला (लागू असल्यास), राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था / व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), विविध पुरावे इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.