सातारच्या संग्रहालयात छत्रपती आप्पासाहेब महाराजांची ‘सुवर्णमुद्रा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात अनेक ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. यापैकी एक छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र आणि सातारा गादीचे वारस छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज यांची सुवर्णमुद्रा(राजमुद्रा) ठेवण्यात आली आहे.

ही राजमुद्रा सोन्याची असून अष्टकोनी आहे. राजमुद्रेवर लेख हा संस्कृत भाषेत आहे. सुरुवातीला सूर्य चंद्र ही प्रतीके दर्शविली आहेत. ही राजमुद्रा सातारच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात इतिहास प्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

छत्रपती प्रतापसिंह महाराज (पहिले) यांच्यानंतर १८३९ ते १८४८ गादीवर असलेल्या छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज हे अजूनही समाजाला अनभिज्ञ आहेत. त्यांचे योगदानही समाजाला माहीत नाही. त्यांचे छायाचित्र अथवा पुतळेही कुठे दिसत नाही. मात्र त्यांनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी केलेली कामे पाहता ते किती प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते याची प्रचिती येते. साताऱ्यातल्या दळणवळणासाठी मोठ्या ओढ्यांवर त्यावेळी त्यांनी मोठे पूल बांधले होते. हे आजही शहरातील करंजे भागात भक्कम स्थितीत आहेत. राज्याभिषेकाच्या वेळी आप्पासाहेब यांनी छत्रपती शहाजी हे नाव स्वीकारले होते. त्यावेळी त्यांनी ही राजमुद्रा प्रसिद्ध केली होती.

या राजमुद्रेवर ‘श्री स्वस्तिश्री शिवसंप्राप्त श्रिय: श्री शाह जन्मन: श्रीमच्छाहाजिराजस्य श्रीमुद्रेय विराजते’ असा मजकूर आहे. मात्र हे राजमुद्रा शिक्का उठविलेले पत्र अगर एखादा दस्तावेज इतिहासात अद्यापही उपलब्ध झालेला नाही.