लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे अंकलजी सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवराव तथा अंकलजी सोनवणे (पुणे) यांना जाहीर करण्यात आला आहे. दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.

समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे म्हणाले की, मातंग समाजामध्ये बुद्ध, कबीर, फुले, शाहू आंबेडकर व लहुजी साळवे यांचे विचार रुजविण्याचे काम यादवराव तथा अंकलजी सोनवणे यांनी केले आहे. समाजातील आठरा पगड जाती जमाती, भटके विमुक्त आदिवासींना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. तसेच पुरंदर तालुक्यातील लहुजी साळवे यांच्या कुलभूमीत लहुजींचा पुतळा उभारण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहेच. त्याचबरोबर मातंग समाजात आंबेडकरवाद रुजविण्याचा मोलाचा वाटा आहे.

सदरचा पुरस्कार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती सोहळ्यामध्ये ख्यातनाम राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर (कोल्हापूर) यांचे अध्यक्षतेखाली व मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकावर अध्यक्ष प्रमोद तोडकर (आण्णा), कार्याध्यक्ष अमोल (आप्पा) भोसले, नियोजन समिती अध्यक्ष राम दाभाडे, अॅड. विशाल देशपांडे, सुरज घोलप, जयवंत सकटे, भास्कर तडाखे, सचिव हरिभाऊ बल्लाळ, सह सचिव सौ. निलम लोंढे, गजानन सकट, प्रा.पै. अमोल साठे यांची नावे आहेत.