परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ करणार अर्थ सहाय्य; इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीमध्ये शिक्षणाच्या प्रमाणात खूपच चांगली प्रगती झाली आहे. परंतु घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमूळे या घटकातील मुला – मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, म्हणून त्यांच्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज योजना पुन:श्च सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे यांनी दिली.

देशातील व विदेशातील उच्चशिक्षणासाठी ही योजना आहे. देशातर्गंत शिक्षणासाठी 30 लाख व विदेशातील शिक्षणासाठी 40 लाख रुपयांपर्यंत कर्जाची मर्यादा असेल. यासाठी महामंडळामार्फत शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थी निहाय निधी एन.एस.एफ.डी.सी. कडून मिळणार आहे. विदेशातील शिक्षणासाठी 3 लाख रुपये एवढी उत्पन्न्‍ मर्यादा आहे. 10 लाख रुपयांपर्यत कर्ज परतफेडीचा कालावधी 10 वर्षाचा तर त्यापेक्षा जास्त कर्जाचा परतफेडीचा कालावधी 12 वर्षाचा राहिल. शिक्षण पूर्ण घेऊन 6 महिन्यांची किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे आधी होईल तेव्हापासून कर्ज परतफेड सुरु करायची आहे.

व्यावसायिक, वैदयकीय, तंत्रशिक्षण यासह इतर अभ्यासक्रमांचा समावेश या योजनेत केला आहे. अभ्यासक्रमाची अधिक माहितीसाठी https://www.nstdc.nic.in या संकेतस्थळास भेट दयावी. अधिक माहितीसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट, उड्डाणपुलाजवळ एमआयडीसी रोड, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.