सातारा प्रतिनिधी | अंगणवाडी कर्मचार्यांवर आयसीडीएस अंतर्गत नसलेले काम तहसील व कृषी खात्याने टाकले आहे. यासह त्याच्या रखडलेल्या विविध मागण्या पूर्ण कराव्या, या मागणीसाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षका, सेविका संघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी अॅड. नदीम पठाण, सुजाता रणनवरे, माया जगताप, सुरेखा डोळसे, सुरेखा शिंदे, वर्षा पवार, मालन जाधव, छाया पन्हाळकर, अर्चना अहिरेकर आदी उपस्थित होत्या.
कोरोना काळात केलेल्या कामाचा भत्ता द्यावा, अंगणवाडी सेविकांना मासिक पेन्शन मिळावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भत्ता मिळावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. याबाबत 2 मार्चपर्यंत निर्णय न झाल्यास मुंबईतील आझाद मैदान येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.