पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 20 जण तडीपार; 32 जणांकडून वर्तणुकीबाबतचा बॉंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्‍यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषगाने हद्दीतून 20 सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत. तर 32 इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉंड पुसेगाव पोलिसांनी लिहून घेतला घेण्यात आहे.

पुसेसावळी या ठिकाणी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे जाळपोळ व दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांकडून अनंत चतुर्दशी व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील अनेक गावातील गुन्हे दाखल असलेल्या युवकांचा शोध घेत त्यांची वर्तवणुकीबाबत चौकशी करण्यात आली. यामध्ये 20 जणाची चौकशी केल्यानंतर त्यांच्या विरोधात हद्दपारीचे आदेश देण्यात आले.

पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांच्या निर्देशाप्रमाणे दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्यासूचना होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 26 व्यक्तींवर हद्दपारीचा प्रस्ताव सातारा तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने सातारा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे सादर झाला होता. त्यानुसार कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सातारा तालुक्‍यातील 26 जणांवर हद्दपारीचे आदेश बजावले आहेत. 29 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत सातारा, जावळी, कोरेगाव या 3 तालुक्‍यांतून हद्दपार करण्यात आले आहे.