सातारा प्रतिनिधी । सध्या शेतात राबणारा शेतकरी अनेक कर्णनै संकटात ये आहे. जास्त पिकाचे उपोलादां घेतले कि त्याला दर कवडीमोल मिळत आहे. तर हातातोंडाशी पीक आल्यास अवकाळी पाऊस कोसळून पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान, एक कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपले कांदे बेळगावला विकून तब्बल १८ लाख कमवले होते. ते पैसे घेऊन मोठ्या आनंदात तो घरी परतत होता. मात्र, असं काही घडलं कि शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले. साताऱ्याजवळील शिरूर येथे घडली आहे. बेळगावहून पुण्याकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची तब्बल १८ लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने हातोहात लांबविली आहे.
साताऱ्याजवळ कांदा उत्पादक शेतककडील रोकड लंपास करण्यात आल्याची ही धक्कादायक घटना दि. ३ रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास वाढे फाटा येथे घडली. याबाबत शेतकऱ्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील शिरूर बतालुक्यातील वडगाव रासाई येथील राहणारे शेतकरी सतीश शंकर ढवळे (वय ३५) कांदा विक्रीसाठी टेम्पो घेऊन बेळगावला गेले होते. कांदा विक्रीतून आलेली रोकड त्यांच्याजवळ त्यांनी ठेवली होती. त्यांच्यासोबत अन्य दहाजण होते. हे सर्वजण टेम्पोमधून लोणंदमार्गे शिरूरला निघाले होते. यावेळी वाढे फाट्यावर आल्यानंतर सर्वजण रात्री चहा पिण्यासाठी खाली उतरले.
याचवेळी अज्ञात चोरट्याने टेम्पोमध्ये ठेवलेल्या बॅगेतील १८ लाख ९२ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच मोबाइल, पाकीट, कागदपत्रे हातोहात लांबविली. चहा पिऊन आल्यानंतर सर्वजण पुढील प्रवासाला निघाले. लोणंदमार्गे जात असताना काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना बॅगेत पैसे नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी जिथं चहा पिला. त्या ठिकाणी परत येऊन चाैकशी केली. मात्र, त्यांचे पैसे काही सापडले नाहीत. चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या एवढ्या मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याचे समोर आले. रात्री आठ वाजता त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने हे अधिक तपास करीत आहेत.