टॅंकरच्या धडकेत फलटणमधील वृद्ध जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराडवाडीजवळ टॅंकरने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला असल्याची घटना गुरुवारी घडली. सुरेंद्र किसनराव भोसले (वय 55) असे अपघातातील मृताचे नाव असून डोक्याचा चेंदामेंदा झाल्यामुळे घटनास्थळावरील चित्र अंगाचा थरकाप उडविणारे होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील साखरवाडी बडेखान रोडवर गुरुवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास खराडवाडी जवळ ट्रक क्रमांक (MH 16 Q 7165) या टॅंकरने साखरवाडी येथील सुरेंद्र किसनराव भोसले (वय 55, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांना जोरदार धडक दिली. यामध्ये सुरेंद्र भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. या अपघातानंतर टॅंकर चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी अरूण विठ्ठल नलवडे (रा. जिंती) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादीनंतर टॅंकर चालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताची खबर मिळताच लोणंद पोलीस ठाण्यातून पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या अपघाताचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.