‘तुमच्यावर मनी लाँड्रिंगची केस आहे’ असे सांगत वृध्द डॉक्टरला पावणेबारा लाखाला फसवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । दोघाजणांनी मोबाईलवरुन संपर्क करुन “तुमच्यावर मनी लॅंड्रींची केस आहे. तुमच्याबरोबर कुटुंबाला तुरुंगात टाकेन,” अशी धमकी देऊन वृध्द डाॅक्टरकडून सुमारे पावणे बारा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील वृद्ध डॉक्टर सुभाष गणपती घेवारी (वय ७१, रा. उत्तेकर नगर, सदरबझार सातारा) यांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. तर अनिल यादव आणि सुनील कुमार (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या दोघांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी सांगितले की, यातील तक्रारदार हे निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी आहेत. दि. १७ ते १८ मार्चदरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. डाॅ. घेवारी हे घरी असताना त्यांना विविध दोन मोबाइलवरुन काॅल आले. त्यांनी आपली नावे अनिल यादव आणि सुनील कुमार असल्याचे सांगितले. त्यानंतर घेवारी यांच्याशी मोबाइलवरुन वारंवार संपर्क करण्यात आला. यावेळी आरोपींनी “तुमच्यावर मनी लॅंड्रींची केस आहे. त्यामध्ये तुम्ही डिफाॅल्टर आहात. यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुरुंगात टाकू,” अशी धमकी देण्यात आली. तसेच घेवारी यांना पैसे पाठविण्यास भाग पाडले.

यामध्ये ११ लाख ७४ हजार २३ रुपयांची रक्कम घेवारी यांनी आरोपींना पीं पाठवली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डाॅ. सुभाष घेवारी यांनी २१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदनों झाला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलेला आहे.