साताऱ्यातील गुंतवणूक परिषदेत उद्या राज्य शासनासोबत होणार सामंजस्य करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा येथे उद्या मंगळवार दि. 05 रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद मास भवन, एमआयडीसी, एरिया, सातारा येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी व गुंतवणूकदार व व्यवसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सकाळी 10 वाजता आयोजित परिषदेत राज्य शासनासोबत सामंजस्य करार होणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे हस्ते गुंतवणूक परिषदेचे उदघाटन होणार असून विकास आयुक्त (उदयोग, निर्यात) तथा अध्यक्ष(मैत्री), जिल्हाधिकारी, उदयोग सह संचालक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्ह्यांना विकासाचे केंद्र मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे तसेच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या गुंतवूणक परिषदेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रमुख उदयोग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणूकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, उद्योजकांचे अनुभव कथन आदींचा समावेश असणार आहे.

तसेच प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्याच्या उत्पादनांचे प्रदर्शन, निर्यातक्षम उत्पादने, भौगोलिक मानांकन असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन इ. चे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक , जिल्हा उद्योग केंद्र, सातारा, प्लॉट नं. ए-१३ जुनी एमआसडीसी, सातारा, जि, सातारा दुरध्वनी क्रंमाक ०२५६२- २४४६५५ ईमेल आयडी येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक उ.सु दंडगव्हाळ यांनी केले आहे.