कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी बिबटयांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी पहाटे वराडे गावात बिबट्याने कुत्र्यांवर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आज रविवारी पहाटेच्या सुमारास कोयना वसाहतीमधील भर वस्तीत एक बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना वसाहत येथील सचिन भोसले यांच्या घरासमोर असलेल्या एका कन्ट्रक्शनच्या इमारतीमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास काही कुत्र्यांचे होते. या ठिकाणी एक बिबट्याने अचानक त्या टोळक्यावर हल्ला केला. अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे कुत्र्यांची एकच धावपळ उडाली. कुत्र्यांच्या आवाजानंतर बिबट्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली.
भरवस्तीत पहाटे बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला; हल्ल्याचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
कोयना वसाहतीमधील घटना pic.twitter.com/55NsCIkXxl
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 1, 2023
दरम्यान, या बिबट्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे कोयना वसाहत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अन्नाच्या शोधासाठी बिबट्या आता मानवी वस्तीत शिरकाव करीत असल्याने वन विभागाने या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.