सातारा प्रतिनिधी । रेल्वे गाडी घसरण्याचा घटना फार कमी घडतात. मात्र, एखादी घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम देखील गंभीर पहायला मिळतात. अशीच घटना पुणे – मिरज लोहमार्गावर कोरेगाव आणि सातारा रेल्वे स्थानकांदरम्यान तांदूळवाडी नजीक असलेल्या खिंडीजवळ शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणाहून मिरजेहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या रिकाम्या ऑईल टँकरची चाके रूळावरून घसरली. त्यामुळे सातारा आणि पुणे दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, मिरज व कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. कोयनासह मैसूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस तब्बल एक ते दीड तास विलंबाने धावलया.
अचानक रेल्वेच्या रिकाम्या ऑइल टँकरची चाके घसरल्याने डाऊन मार्गावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली. कोरेगावकडून साताराच्या दिशेने जात असताना तांदूळवाडी गावानजीक रिकाम्या ऑईल टँकरची चाके रूळावरून घसरलयामुळे पुणे आणि मुंबई मार्गांवरील वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली. ऑईल टँकरची चाके रूळावरून बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यास खूप वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मिरज येथून क्रेन पाठवण्यात येणार आहे. तोपर्यंत पुणे, मुंबईच्या दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत.
काही एक्सप्रेस या अपघातामुळे रखडल्या. मात्र, मिरज, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला नाही. अपघातस्थळी आणि कोरेगाव रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून राहिले मिरजेहून मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या रिकाम्या ऑइल टँकरचे इंजिन कोरेगाव स्थानकावर सोडविण्यात आले आहेत. ते इंजिन तांदूळवाडी येथे नेऊन अपघातग्रस्त ऑईल टँकर सोडून अन्य शिल्लक असलेले रिकामे ऑइल टँकर कोरेगाव स्थानकावर रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आणण्यात आले.