सातारा प्रतिनिधी । तुमच्या क्रेनचा चालक कुठं हाय? अशी विचारणा करत १० ते १५ जणांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना सातारा शहराजवळ नुकतीच घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १५ जणांविरोधात दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
याबाबत पोलिसांनी व यश प्रमोद चतूर (रा. जरंडेश्वर नाका, खेड सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास सातारा शहराजवळ कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला अनोळखी १५ जणांनी तुमच्या क्रेनचा चालक कुठे आहे? असा सवाल करत विचारणा केली.
यावरुन चतुर यांनी व त्यांच्याबरोबरच्या एकाने दोन – तीन वेळा काय झाले आहे? असे म्हटले. यावरुन चिडलेलयानी दोघांपैकी एकाला पायावर, हातावर मारहाण करत दुखापत केली. तसेच शिवीगाळ आणि दमदाटीही केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलिस उपनिरीक्षक गवळी हे तपास करीत आहेत