विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कराडात पार पडली MIDC उद्योजकांची महत्वाची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | निवडणुकीच्या अनुषंगाने कराड तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम (एमआयडीसी) अंतर्गत सर्व छोटे-मोठे उद्योजक अधिकाऱ्यांची बैठक उपविभागीय कार्यालय कराड येथे २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

एमआयडीसी मधील सर्व अधिकाऱ्यांना व उद्योजकांना मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणुक होत असून मतदान प्रक्रिया निर्भय, स्वतंत्र व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य लाभत आहे.

त्या अनुषंगाने आपणालाही सुचित करण्यात येत आहे की, २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी एमआयडीसी मधील सर्व कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी सवलत देण्यात यावी. तसेच कोणताही कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आपण सर्वांनी घेऊन निवडणूक आयोगास सहकार्य करावे असे सूचित केले.