सातारा प्रतिनिधी । मतदारयादीत deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. अशी कोणतीही procedure मतदान केंद्रावर होत नसल्याची महत्वाची माहिती सातारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की, ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे कि ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा.
अशा प्रकारचा फेक मेसेज काही व्हाट्सअप वरून फिरत आहे. तरी सदरचा मेसेज ही निव्वळ अफवा असून यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये, तसेच मतदान प्रक्रिये संबंधी अशा प्रकारच्या अफवा ही कोणी पसरवू नयेत, अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सुधाकर भोसले यांनी सांगितले.