कराड प्रतिनिधी । कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोचा पुणे बंगरूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक वाठार हद्दीत 25 फूट सर्विस रस्त्यावरील खड्ड्यात पडून अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक हा जखमी झाला असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून आज गुरुवार सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक आयशर टेम्पो कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला होता. यावेळी भरधाव वेगाने चालवणाऱ्या टेम्पो चालकाचा वाठार गावच्या हद्दीत येताच टेम्पोवरील ताबा सुटला. त्यानंतर अचानक टेम्पो महामार्गालगत सर्व्हिस रस्त्याच्या २५ फूट खोल खड्यात जाऊन कोसळला.
या अपघात टेम्पोचे पुढील बाजूचा चक्काचूर झाला असून टेम्पो चालक देखील जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती नागरिकांनी महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी दाखल होत अपघातग्रस्त टेम्पो चालकास तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.