भरधाव वेगाने निघालेल्या पिकअप गाडीचा अचानक फुटला टायर; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील अनवडी येथे रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. पुण्याकडून साताऱ्याकडे निघालेल्या पिकअप गाडीचा अचानक टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून एमएच ११ डीडी ००६८ हि पिकअप गाडी पुण्याहून सातारच्या दिशेने निघाली होती. यावेळी भरधाव वेगाने निघालेल्या गाडीचा अनवडी हद्दीत अचानक टायर फुटला. यामुळे गाडीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. अचानक गाडी पलटी झाल्यामुळे गाडीला चालक किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली.

तसेच या अपघाताची माहिती ग्रामस्थांनी भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांना दिली. त्यांनी तात्काळ भुईंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या अपघातातील एका किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून यात कोणतीच जीवित हानी झालेली नाही. या अपघाताचा अधिक तपास भुईंज पोलिसांकुन केला जात आहे.