कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील नडशी कॉलनीयेथे शिरवडे स्टेशन रस्त्यालगत बुधवारी सकाळच्या सुमारास दुचाकीवरुन आलेला एक जण एक बॅग ठेवून कराडच्या दिशेने निघून गेला. ही गोष्ट स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीती पसरली होती.
संशयास्पद आढळून आलेल्या या बॅगेत नेमकं काय आहे? या भीतीने स्थानिक नागरिकांनी याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरोटे यांनी पोलीस कर्मचारी डी. आर. काळे, नीलेश विभूते, संदेश दीक्षित, पोलीस पाटील वैशाली गायकवाड यांना घटनास्थळी पाठवले.
मात्र, पोलिसांनी तपासणी केली असता बॅगमध्ये किरकोळ साहित्य सापडले. आणि पोलीस आणि स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बॅगेत आढळल्या ‘या ‘ वस्तू
ज्यावेळी तळबीड पोलिसांनी बॅग असलेल्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्यांनी बॅग उघडुन आतमध्ये बघितले असता त्यामध्ये जेवणाचा डबा, मोजणी टेप असे साहित्य सापडले. त्यानंतर बॅग ही कोणी कामगाराने ठेवली असावी, असे दिसून आले.