सातारा प्रतिनिधी । लहान मुले खेळताना दंगा केल्यावर आपण त्याला ओरडून गप्प बसवतो. लहान मुलांकडून अनेक प्रकारे त्रास दिला जातो. मात्र, काही क्षुलक कारणावरून त्याला बेदम मारहाण करणे हे चुकीचेच. असाच प्रकार साताऱ्यात सोमवारी सायंकाळी घडला. केवळ पिपाणी वाजवत असल्याच्या कारणावरून ८ वर्षांच्या मुलाला एका मेडिकल दुकानदाराने बेदम मारहाण केली. आणि मारहाणी मुलगा इतका जखमी झाला कि त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील गुरुवार परजावर काल सोमवारी सायंकाळी गणेशोत्सवाची लगबग असल्यामुळे एक कापड विक्रेता कपडे विक्री करत बसलेला होता. त्याचा ८ वर्षांचा मुलगा त्याच्या सोबतच होता. यावेळी कपडे विक्रेत्याच्या मुलाने वडिलांकडून एक पिपाणी मागून घेत यो वाजवू लागला. तो ज्या ठिकाणी पिपाणी वाजवत होता त्याच्या शेजारी एक मेडिकल दुकान होते. त्या मेडिकल दुकानदारास त्रास होऊ लागल्याने त्याने राग मनात धरून त्या मुलाला पाठलाग करून अंगावर वळ उठेपर्यंत बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी मुलाला सोबत घेऊन थेट सातारा शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्या मुलाला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. या घटनेची चांगलीच चर्चा सातारा शहरात सुरु आहे.