कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील टेंभू गाव परिसरातील टप्पा क्रमांक एक ब धरण परिसरात आपल्या सहकारी मित्रांसोबत रंगपंचमी खेळण्यासाठी आलेली एक अठरा वर्षीय युवती धरणात बुडाल्याची घटना घडली बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस व स्थानिक नागरिकांकडून संबंधित बुडालेल्या युवतीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.जुही घोरपडे (वय १८, रा. कराड, जि. सातारा) असे बुडालेल्या युवतीचे नाव आहे.
याबाबत घटनस्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील टेंभू येथे धरणातील टप्पा क्रमांक एक ब या ठिकाणी संबंधित युवती आपल्या मित्रांसमवेत रंगपंचमी खेळण्यासाठी आलेली होती. याठिकाणी रंगपंचमी खेळत असताना युवतीसह तिच्या दोन सहकारी मित्रांचा पाय घसरला आणि त्याचा तोल जाउन ते तिघे पाण्यात पडले. पाण्यस्त पडल्यानंतर बुडालेले युवक पाण्यसातून बाहेर आले. मात्र, युवती पाण्यात वाहून गेली.
घटना घडल्यानंतर युवकांनी याबाबतची माहिती स्थानिक नागरिक व पोलिसांना आली. माहिती मिळाल्यानंतर कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. याठिकाणी स्थानिक नागरिकांसह पोलिसाकडून संबंधित युवतीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. संबंधित युवतीने नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली असून आज रंगपंचमी निमित्त ती आपल्या सहकाऱ्यांसोबत टेंभू धरण या ठिकाणी आलेली होती.