अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा; पुसेसावळीतील सभेत डॉ. कोल्हे यांचा महायुतीवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा करण्यात आली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला असणाऱ्या उज्ज्वल परंपरेला काळिमा फासला. त्यामुळे प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या मनात राग आहे. त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या वतीने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, संगीता साळुंखे, भाग्यश्री भाग्यवंत, मानसिंगराव जगदाळे, जितेंद्र पवार, चंद्रकांत पाटील, पैलवान संतोष वेताळ, संतोष घार्गे, सुरेश पाटील, सुहास पिसाळ, दिग्विजय पिसाळ, सौरभ पाटील, सी. एम. पाटील, दत्तात्रय रुद्रुके उपस्थित होते.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, “दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडण्यात आले. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना विकासासाठी फोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. हे सर्व विकासासाठी असेल, तर इथल्या सोयाबीनला चांगले भाव मिळालेत का? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं. का? तरुणांना रोजगार मिळाला का? कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत झाली का? यातले प्रत्येक उत्तर नकारार्थी आहे. ते महाराष्ट्रासाठी नव्हे, तर फक्त स्वार्थासाठी जाऊन बसलेत. स्वार्थासाठी सत्तेत बसलेल्यांना आता खाली खेचण्याची वेळ आहे.