सातारा जिल्ह्यात वाढला उन्हाळा; वाहनांच्या स्पेअर्सपार्टसोबत टायरचे आरोग्य सांभाळा

0
93
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । उन्हाळा ऋतूस सुरुवात झाली असून सध्यस्थितीत आपल्या आरोग्यसह वाहनांच्या आरोग्याची देखील काळजी घेणार आवश्यक आहे. कारण उन्हाळ्यात वाहनांना आग लागण्याच्या, टायर फुटण्याच्या घटना देखील घडत असतात. उन्हाळ्यात गाडीतील टायरमधील हवेचा दाब समतोल ठेवावा लागतो. उन्हाळ्यात टायरची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असते. ते किती झिजले आहेत, हे तपासले पाहिजे. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर टायर फुटण्याचा धोका असतो. चालत्या वाहनाचे टायर फुटल्यानंतर अपघातही होऊ शकतो. त्यामुळे टायरकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

उन्हाळ्यात डांबरी रस्ते जास्तकरून तापलेले असतात, या तापलेल्या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी किंवा मोठी वाहने नेताना घर्षणातून खराब असलेले किंवा झिजलेले टायर फुटू शकतात. तसेच कंपनीने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा हवा जास्त भरल्यास दाब वाढून टायर फुटण्याचा धोका असतो. चालत्या वाहनाचे टायर फुटून अपघात झाल्याची आपण पाहत असतो. त्यामुळे वाहनांचे टायर मेकॅनिक किंवा कंपनीच्या शोरूममधून तपासून घेतले पाहिजेत.

36 अंशांवर तापमान

यंदा उन्हाळा लवकर सुरु झाल्याचे दिसून येत हाये. कारण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तापमापीतील पारा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. ऐन उन्हाळ्यात तो ४० पर्यंत जातो. कधी-कधी त्यापेक्षाही जास्त अंशापर्यंत जातो.

उन्हाळ्यात टायर का फुटतात?

उन्हाळ्यात डांबरी रस्ते किंवा सिमेंटचे रस्ते तापलेले असतात. त्यावरून वाहने जाताना वेग जास्त असेल तर अधिक घर्षण होऊन टायरमधील हवादेखील गरम होते. त्यामुळे टायर फुटू शकतात. मोटारींचे टायर हे जवळपास ४० ते ५० हजार किलोमीटर अंतरापर्यंत टिकतात. तसेच टायरची गुणवत्ता, रस्त्यांची स्थिती, हवामान, वाहन चालवण्याची शैली यावरही टायरचे आयुष्मान अवलंबून असते. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खराब किंवा झिजलेले टायर फुटण्याचा धोका अधिक असतो.

टायरमध्ये नायट्रोजन अधिक सुरक्षित

कॉम्प्रेसरमधील हवेपेक्षा नायट्रोजन हवा थंड असते. त्यामुळे वाहन वेगाने आणि जास्त वेळ चालवले तरी टायर गरम होत नाही. परिणामी, टायर फुटण्याचा धोका टळतो त्यामुळे उन्हाळ्यात नायट्रोजन हवेचा वापरकरणे अधिक सोईचे ठरते.

व्हील अलाइनमेंट, टायर रोटेशन महत्त्वाचे

गाडीचे व्हील अलाइनमेंट आणि टायर रोटेशनचे महत्त्व आहे. व्हील अलाइनमेंटमध्ये त्रुटी असल्यास टायर असमानपणे वापरले जाऊन लवकर खराब होतात. हवेचा दाब, टायरची स्थिती, व्हील अलाइनमेंट, रोटेशन याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते.

मोठ्या टायर्सला रिमोल्डचा पर्याय उपलब्ध

सध्या टायर्सच्या किमती वाढलेल्या आहेत. टायरसाठी जादा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे अनेक वाहन मालक टायरला रिमोल्ड करतात. मोठ्या गाड्यांचे टायर रिमोल्ड केले जाते. परंतु रिमोल्ड टायर काही काळच टिकतात. मोठ्या गाड्यांच्या टायरला २ रिमोल्ड करता येते. परंतु दुचाकी, मोपेडचे टायर रिमोल्ड करता येत नाही. त्यापेक्षा नवीन टायर खरेदी करणे, हा चांगला पर्याय ठरू शकतो.

याकडेही अवश्य लक्ष द्या

टायरच्या ट्रेड डेप्थची नियमित तपासणी करा. टायरच्या फुगवट्याची तसेच टायरचा कट किंवा साईड वॉल नुकसानीची, व्हॉल्व्ह स्टेमची तपासणी करावी. टायर ट्रेडवर असलेल्या रबरच्या छोट्या बारकडेही लक्ष द्यावे. दूरवर प्रवासाला जाण्यापूर्वी नियमितपणे मेकॅनिककडून तपासणी करुन घ्यावी. शिवाय प्रवासादरम्यान शक्यतो शक्य तिथे टायर तपासावे.