सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्या बुधवार दि. ०६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या माध्यमातून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून सचिन पाटील हे निवडणूक लढवत आहेत.
बुधवार दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना ना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ऑनलाईन संबोधित करणार असल्याची माहिती सुद्धा फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांनी दिली.