साताऱ्यात अजितदादांच्या कार्यक्रमात निम्मा मंडप रिकामा; महिलांनी भर कार्यक्रमातून घेतला काढता पाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. या कार्यक्रमासाठी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला दांडी मारली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीती मंगळवारी झालेला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्याकडे लोकांनी पाठ फिरवल्यानं निम्मा मंडप रिकामा पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. बँकेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

अजितदादांच्या कार्यक्रमाचा फ्लॉप शो

मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सातारा जिल्ह्याने अजित पवारांना मोठी ताकद दिली होती. अजितदादा साताऱ्यात येणार म्हटलं की तरूणांपासून ते वृध्द कार्यकर्त्यांपर्यंत झाडून सर्वजण दादांच्या स्वागताला हजर असायचे. त्यांचा प्रत्येक दौरा झंझावाती व्हायचा. कार्यक्रमात टाळ्या, शिट्ट्या ऐकायला मिळायच्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, साताऱ्यातील त्यांचा मंगळवारचा कार्यक्रम पूर्णपणे फ्लॉप झाला.

बँकेच्या जडणघडणीत पालकमंत्र्यांचं योगदान काय?

अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री म्हणून आमंत्रित केलं होतं. वास्तविक, पालकमंत्र्यांचे आजोबा, लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचं बँकेच्या स्थापेन आणि जडणघडणीत मोठं योगदान होतं. परंतु, आजवर बँकेचे संचालक देखील नसताना शंभूराज देसाईंची कार्यक्रमातील हजेरी अनेकांना खटकली. त्यामुळे पाटणमधील शरद पवार गटाच्या लोकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसलं.

बँकेला अग्रस्थानी नेण्यात उंडाळकरांचं भरीव योगदान

एकेकाळी संपूर्ण सातारा जिल्ह्यावर पकड निर्माण केलेल्या लोकनेते दिवंगत शिस्तीमुळे सातारा जिल्हा बँक विलासकाका उंडाळकर यांच्या कडक शिस्तीमुळं सहकारातील अग्रगण्य बँक बनली. पारदर्शक कारभारामुळे नाबार्डने सातारा जिल्हा बँकेला अनेकदा गौरवलं आहे. त्याचं श्रेय विलासकाका उंडाळकरांना दिलं जातं. अमृत महोत्सवाच्या आढाव्यात उंडाळकरांच्या योगदानाची कुठे दखल घेण्याची तसदी विद्यमान संचालक मंडळानं घेतली नसल्याचंही पाहायला मिळालं.