सातारा प्रतिनीधी । विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेल असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशात राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी बाहेर आली आहे. यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं असून यादीत वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा समावेश आहे. हातातून गेलेल्या बालेकिल्ला साताऱ्यातील वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील (Makarand Patil) निवडणूक लढवणार आहेत. साताऱ्यातून वाई मतदार संघातून जरी उमेदवार दिला असला तरी आठ विधानसभा मतदार संघापैकी अजितदादांच्या वाट्याला एकच मतदार संघ अल आहे की काय? फलटण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघ अजितदादांना भाजपला सोडावा लागतोय की काय? अशी देखील चर्चा सध्या सुरु आहे.
राजधानी दिल्लीत महायुतीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजप 155 जागा लढणार आहे. शिवसेना शिंदे गट 78 जागा लढणार आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 55 मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
राज्यातील सगळ्याच भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील शिवसेना, भाजप आणि अजित पवार गट यामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचे बोलले जात असले तरी उमेदवारांची नावे असलेल्या संभाव्य याद्या सध्या भेर बाहेर येऊ लागल्या आहेत.
राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गटाला मोठा फटका
राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर लागलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला मोठा फटका बसला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात झपाटून प्रचार केला. अशातच आता अजित पवार गट महायुतीत लढणार असून येत्या एक दोन दिवसात जागावाटप होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे सध्या अपक्ष आमदारांसह चाळीस ते पन्नास आमदार आहेत. त्यांचा आता संभाव्य यादी समोर आली आहे.
विद्यमान आमदारांना संधी
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदरांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र राजेंद्र शिंगणे आणि फलटणचे दीपक चव्हाण यांची नाव सध्या चर्चेत असलेल्या संभाव्य यादी नाहीत. दीपक चव्हाण यांनी यापूर्वीच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. तर राजेंद्र शिंगणे देखील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा असल्याने त्यांनाही संभाव्य यादीतून वगळण्यात आलं आहे. अजित पवारांच्या पक्षाच्या संभाव्य यादीमध्ये एकूण ४१ नावं आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील मतदारसंघांमधून अजित पवारांच्या पक्षातून कोणाला संधी दिली जाईल हे पहावं लागणार नाही.
अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
बारामती विधानसभा – अजित पवार
येवला विधानसभा – छगन भुजबळ
कागल विधानसभा – हसन मुश्रीफ
परळी विधानसभा – धनंजय मुंडे
दिंडोरी विधानसभा – नरहरी झिरवळ
अमळनेर विधानसभा – अनिल पाटील
तुमसर विधानसभा – राजू कारेमोरे
अर्जुनी मोरगाव विधानसभा – मनोहर चंद्रीकापुरे
अहेरी विधानसभा – धर्मारावबाबा आत्राम
पुसद विधानसभा – इंद्रनील नाईक
वसमत विधानसभा – चंद्रकांत नवघरे
कळवण विधानसभा – नितीन पवार
सिन्नर विधानसभा – माणिकराव कोकाटे
निफाड विधानसभा – दिलीप बनकर
देवळाली विधानसभा – सरोज अहिरे
शहापूर विधानसभा – दौलत दरोडा
श्रीवर्धन विधानसभा – अदिती तटकरे
उदगीर विधानसभा – संजय बनसोडे
जुन्नर विधानसभा – अतुल बेनके
आंबेगाव विधानसभा – दिलीप वळसे पाटील
खेड, आळंदी विधानसभा – दिलीप मोहिते
इंदापूर विधानसभा – दत्तात्रय भरणे
मोहोळ विधानसभा – यशवंत माने
मावळ विधानसभा – सुनील शेळके
वाई विधानसभा – मकरंद पाटील
चिपळूण विधानसभा – शेखर निकम
पिंपरी विधानसभा – अण्णा बनसोडे
वडगाव शेरी विधानसभा – सुनील टिंगरे
चंदगड विधानसभा – राजेश पाटील
हडपसर विधानसभा – चेतन तुपे
अकोले विधानसभा – किरण लहामटे
करमाळा विधानसभा – संजय शिंदे
मोर्शी- विधानसभा देवेंद्र भुयार
कोपरगाव विधानसभा – आशुतोष काळे
अहमदनगर शहर विधानसभा – संग्राम जगताप
माजलगाव विधानसभा – जयसिंह सोळंके
अहमदपूर विधानसभा – बाबासाहेब पाटील
अणुशक्तीनगर विधानसभा – सना मलिक
शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा – नवाब मलिक
अमरावती शहर विधानसभा – सुलभा खोडके
इगतपुरी विधानसभा – हिरामण खोसकर