Ajit Pawar : उदयनराजेंच्या साताऱ्यातील उमेदवारीबाबत अजितदादांनी केलं मोठं विधान; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची पुण्यात ‘बोट क्लब’ येथे आज बैठक पार पडली. या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. यावेळी सातारा लोकसभा मतदार संघ भाजपकडे गेला असून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळाल्याच्या चर्चेवर अजितदादांनी महत्वाचे विधान केले. “साताऱ्याच्या बाबतीत जो काही निर्णय आहे त्याबद्दल उदयनराजे भोसले यांना भाजप नेते समजावून सांगतील”, असे पवार यांनी म्हंटले.

महायुतीत सातारा लोकसभा जागेवरून दिवसेंदिवस तिढा वाढताना दिसत आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार असल्याने या जागेवर अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार फिल्डिंग लावली असली तरी त्यांच्या उमेदवारीबाबत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचक विधान केले आहे. वास्तविक पाहता अजित पवार गट बारामती, सातारा, शिरूर, परभणी, धाराशिव, नाशिक, रायगड या सात लोकसभा मतदारसंघांबाबत आग्रही आहे.

एकीकडे भाजपकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे पोस्टर उदयनराजेंच्या समर्थकांकडून सोशल मीडियातील व्हारल करत परचाराची जय्यत तयारी देखील केली आहे. उद्या उदयनराजेंचा साताऱ्यात जंगी सत्कार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते त्यांना समजावून सांगतील, या अजित पवारांच्या विधानामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.