सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनि आज वाईत जनसन्मान यात्रेतून लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत लाडक्या बहिणींना महत्वाचे आवाहन देखील केले. “माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला पुढची पाच वर्षे तुमची लाडकी भिन्न योजना सुरु ठेवायची असेल तर राष्ट्रवादीचा उमेदवार जिथे उभा असेल तिथे घड्याळाचे निवडणुकीत बदन दाबा, जिथे धनुष्यबाणाचा कमळाचा उमेदवार उभा असेल ते बटन दाबा, अजितदादांच्या वाडा आहे कि तुम्ही पुन्हा मकरंद आबांना महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या पुढील पाच वर्षे आम्ही ही योजना सुरु चालवू आणि पाच वर्षे वीज माफी देऊ, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोणंद येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पार पडल्यानंतर वाईत जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम झाला. यावेळी वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा आम्ही पुढे नेतोय हि आमची भूमिका आहे. म्हळ्यार काळात काही राजकीय घटना घडल्या. मला सर्व वडीलधाऱ्यांच्या बद्दल आदर आहे त्याबद्दल दुमत असण्याचा काहीच कारण नाही. पण शेवटी निवडून गेल्यानंतर सरकारमध्ये काम करता येत. आम्ही एक वर्षे सरकारमध्ये नव्हतो. आमच्या सर्व कामांना स्थगिती मिळाली. नंतर आम्ही ती स्थगिती उठवली आणि पुन्हा कामांना वेग दिला.
आचारसंहिता कदाचित आठ दिवसांमध्ये लागेल. माझ्या मनामध्ये आले की, जर आचारसंहिता लागली कि काही काहीनी विरोधी पक्षांनी हि योजना बंद करण्याकरिता न्यायालयात गेले आणि हि योजना बंद करा अशी मागणी केली. आम्ही का हि योजना बंद करायची. तुम्ही सरकारमध्ये असताना हि योजना का सुरु केली नाही. आम्ही सुरु केली म्हणून तुमच्या पोटात दुखायचा काय कारण आहे. सातत्याने हि योजना चालणारच नाही. हि लाडकी बहीण योजना निवडणुकीचा जुमला आहे, अशी विरोधकांनी टीका केली.
पहिले तीन हजार रुपये जेव्हा जुलै महिन्याचे पाठवले तेव्हा काढून घ्या पैसे असे म्हणाले. असे शहाण्यांनो भावाला बहिणींनी राखी बांधल्यानंतर त्याबदल्यात दिलेली रक्कम काढून घ्यायची असते का? तुम्हाला काय लाज लज्जा शरम काही आहे का? या ज्या काही माझ्या माउली बहिणी आहेत त्यांना आम्ही रक्षाबंधनाची ओवाळणी दिली आहे आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची ओवाळणी हि भाऊबीजेची दिलेली आहे. याबद्दल काय कोणाला म्हणायचे आहे ते म्हणावे, असे अजित पवार यांनी म्हटले.