सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत निर्णय होत नव्हता. महायुतीतील तिन्ही पक्षांचे एकमत न झाल्यामुळे जागावाटपाची बोलणी लांबली असली तरी भाजपने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्या उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दरम्यान, आज अजित पवार गटाने मागणी केलेल्या एकूण ९ जागांपैकी ६ जागांवरील उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना निश्चित झाल्याची चर्चा शुक्रवारी जिल्ह्यात सुरू होती.
राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचा प्रश्न अजूनही प्रलंबित असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या सहा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा चांगलीच रंगली. या जागांमध्ये रायगड, बारामती, शिरुर, सातारा, धाराशीव आणि परभणी या मतदार संघाचा समावेश होता. यापैकी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली असून अजितदादांकडून साताऱ्यातून रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची देखील चर्चा जिल्हाभर शुक्रवारी झाली.
साताऱ्यात महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या घोषणेकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा पवार गटालाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु होती. या दरम्यान, आज अजितदादा गटाच्या रामराजेंना उमेदवारी मिळाल्याची चर्चा जिल्हाभरात रंगल्याने महायुतीतील जागा वाटपाय अजितदादांनी आपलेच खरे केल्याची चर्चा देखील केली जात होती.
कराड दौऱ्यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिले होते संकेत
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड येथे आले होते. सकाळी कराडला येऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन देखील केले होते. या कराड दौऱ्यावेळी अजितदादांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कामाला लागला सातारा आपल्याकडेच येणार आहे. आणि जिल्ह्यात लोकसभेसाठी आपल्याच गटाला उमेदवारी मिळणार असल्याचे देखील सूतोवाच अजितदादांनी दिले होते.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीकडे….
महाविकास आघाडी सरकारच्या काळाच्या अगोदरपासून सातारा जिल्हा हा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ मध्ये एकदा सातारा लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीकडून तिसऱ्यांदा उमेदवारी उमेदवारी देण्यात आली होती. आणि ते सव्वा लाखनी जिंकून देखील आले होते. मात्र, त्यांनी अवघ्या सहा महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करत खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा सातारा लोकसभेसाठी पोट निवडणुक लागली. या पोटनिवडणुकीवेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा देण्यात आली. आणि खा. शरद पवार यांनी जिवलग मित्र श्रीनिवास पाटील यांना उमेदवार म्हणून उभे केले. त्यावेळी श्रीनिवास पाटील यांनी अवघ्या सहा महिन्यात उदयनराजेंना 86 हजार मतांनी पराभूत केले.
आता अशी लढत होण्याची शक्यता
सातारा जिल्ह्याची लोकसभेची जागा हि राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिली तरी महाविकास आघाडीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार केला जाईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने आता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले आहे. एक खासदार शरद पवार आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट होय. दरम्यान, सातारा लोकसभा जागेसाठी भाजपकडून अद्यापही निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. शिवाय खा. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे सातारच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा गटाकडे हि जागा जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अजितदादा गटाकडे हि लोकसभेची जागा गेल्यास दोन राष्ट्रवादी काँग्रेस गटात लोकसभेची निवडणूक होणार हे निश्चित.
रामराजेंच्या उमेदवारीबद्दल सोशल मीडियात चर्चा
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा पवार गटाचे जेष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवार मिळाल्याची सातारा जिल्ह्यातील सोशल मीडियातील व्हॉट्सअप ग्रुपवर शुक्रवारी दुपारपासूनहो लागली. “सातारची महायुतीची जागा अजितदादा गटाकडे, रामराजेंना निंबाळकरांना लोकसभेची उमेदवार”, “अजितदादा गटाचा सातारा लोकसभेचा उमेदवार ठरला, रामराजे निंबाळकरांना खासदारकीची उमेदवारी,” अशा आशयाच्या पोस्ट जिल्ह्यातील अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर दुपारपासून फिरू लागल्या. काहींनी तर सातारा लोकसभेची उमेदवार रामराजेंनाचा? असे प्रश्न निर्माण
राष्ट्रवादीचे ‘हे’ ६ उमेदवार निश्चित
१) बारामती : सुनेत्रा पवार
२) रायगड : सुनिल तटकरे
३) शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील
४) सातारा : रामराजे नाईक निंबाळकर
५) धाराशीव : दाजी बिराजदार
६) परभणी : राजेश विटेकर