साताऱ्यात येताच अजितदादादांच्या डोक्याचा चढला पारा, ‘या’ कारणावरून अधिकाऱ्यांवर संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नसमारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी साताऱ्यातील विकासकामांचा निधी रखडत असल्याची माहिती अजितदादांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी मागचा फूडचा विचार न करता लगेसिव्ह तडकाफडकी आपलया गाडयांचा ताफा घेत सातारा येथील शासकीय विश्रामगृह गाठले. आणि तेथे अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी अजितदादांनी पिण्यासाठी तेथील कर्मचाऱ्याकडे पाण्याची मागणी केली. पण उपमुख्यमंत्री आल्याच्या धांदलीत तो कर्मचारी पाणी देण्यास विसरला. बराच वेळ पाणी न मिळाल्याने अजितदादा चांगलेच संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे त्या कर्मचाऱ्याची तक्रार केली.

यावेळी आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब सोळसकर, अमित कदम, तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात दाखल होताच जिल्ह्यात सुरू असलेले मेडिकल कॉलेज, नूतन शासकीय विश्रामगृह व सैनिक स्कूलचे नूतनीकरण आदी कामे निधीअभावी थांबू नयेत. पुरेसा निधी वेळेत उपलब्ध होत नसेल तर अधिकाऱ्यांनी तातडीने संपर्क करून याबाबतची माहिती देण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात विविध विकासकामांसाठी निधी वेळेत उपलब्ध होतोय का, याचा आढावा घेतला. तसेच सातारा मेडिकल कॉलेजचे काम निधीअभावी थांबले आहे. ते कोणामुळे थांबलंय वित्त विभागामुळे की वैद्यकीय शिक्षण विभागामुळे यांची माहिती घेतली. तसेच बांधकाम विभागाचीही कामे सुरू आहेत, यामध्ये सैनिक स्कूलचे काम तसेच शासकीय विश्रामगृहाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील कोणतीच कामे निधीअभावी थांबू नयेत, याची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत.