सातारा प्रतिनिधी । नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनावेळी खासदार शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या निवडीनंतर पुतणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात असल्याने आज साताऱ्यात त्यांनी आपली भूमिका मांडत काकांच्या निर्णयाबाबत स्पष्टच सांगितले. “१९९१ साली मला खासदार म्हणून बारामतीकरांनी निवडून दिले. त्यानंतर मी ६ महिने तिथले चित्र बघितले. त्यामुळे मी तेव्हा ठरवले होते मला महाराष्ट्रात काम करायचे. तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्रात काम करत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, माननीय पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे मी नाराज नाही. मला केंद्रातील राजकारणात रस नाही. मुळात माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत अशा बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडन करायचे आणि काय झाले ते सांगायचे त्यातच माझा वेळ जातोय. १५ तारखेला काही सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करतायेत त्यासाठी मी धुळ्यात जाणार आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागात कार्यक्रमात मी सहभागी होतोय, पक्षाची भूमिका मांडतोय.
महागाई, बेरोगजगारी आणि शेतकऱ्यांची जी अवस्था आहे त्यांच्याबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न विचारतोय असंही अजित पवारांनी स्पष्ट केले. बारामतीकरांनी जेव्हा १९९१ साली मला खासदार म्हणून निवडून दिले. त्यानंतर मी ६ महिने तिथले चित्र बघितले. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामाची पद्धत यात बराच फरक असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी तेव्हा ठरवलं कि आपण राष्ट्रीय राजकारणापेक्षा महाराष्ट्रात काम करायचे. तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्रात काम करतोय.
शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाबाबत अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले की, मला… pic.twitter.com/pdu6XA30Vm
— santosh gurav (@santosh29590931) June 11, 2023
कार्यकारी अध्यक्षपदी निवड झालेल्यांना काम करायला थोडा तरी वेळ दिला पाहिजे. राष्ट्रीय पक्ष म्हणून गेलेली मान्यता पुन्हा मिळावी आणि पक्षाचे आमदार, खासदार वाढावे यांची सर्वांचीच जबाबदारी आहे. नव्या कार्यकारी अध्यक्षांवर अनेक राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. माझ्यावर आज पर्यंत निवडणुकीची कोणतीही जबाबदारी नव्हती तरी पण मी काम करत होतो. मला कोणीही थांबवले नव्हते. पार्लमेंटरी बोर्डाला मी उमेदवार कोणता असावा हे पटवून सांगू शकतो. मी पक्षाची भूमिका मांडताना पक्षाचाच विचार करतो. माझ्याबद्दल बोलणाऱ्या इतर राजकीय पक्षाचा लोकांची मी तोंड बंद करायची म्हणजे त्यांच्या तोंडात बोळा खुपसू काय? असं मिश्किल उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिले.
साताऱ्यात महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडुन येईल : अजित पवार
नविन लोकं येत असतात, जुनी जात असतात. अनेक नेते पवार साहेबांना सोडुन गेले. म्हणुन पक्ष थांबला नाही. नवीन कोणं आलं आणि जागा भरुन काढली ही सततची प्रोसेस सुरु असते. कोणाचच कोणावाचून नडत नसते. सातारा खासदारकीसाठी आमच्याकडं नावं समोर आली आहेत. मात्र, जागा वाटप झालं नसल्यामुळं आत्ता नावं सांगणे उचित नाही. साताऱ्यात महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडुन येईल, असे अजित पवारांनी यावेळी म्हंटले.