‘दम असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या…’; अजितदादांचं रामराजेंना खुलं चॅलेंज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे फलटण विधानसभेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी फलटणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी अजितदादांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. ‘तुम्ही उघड उघड दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी बघतोच. श्रीमंत राजे दरवाजा लावून चर्चा करतायत, आपल्याला हे शोभत नाही. तुम्ही तिकडे गेलाय तर मारा आमदारकीला लाथ आणि जा. तुमच्यात दम असेल तर आमदारकीला लाथ मारून दाखवा’, असं खुलं चॅलेंज अजित पवारांनी रामराजेंना दिलं आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, बारामतीकर म्हणतात लोकसभेला ताई, विधानसभेला दादा, त्यात दादा असावं म्हणजे झालं. झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला आली आहे, तशीच चूक दुरुस्त करायची संधी बारामतीकरांनाही आली आहे. विरोधक घाबरले आहेत, खोटं बोलत आहेत.

संजीवराजे यांना मी विधानपरिषदेला उभा करत होतो, मात्र रामराजेंनी नकार दिला आणि शेखर गोरेंना उभं केलं. रणजितसिंह निंबाळकर यांचे विरोधक त्यांच्याबाबत फेक नरेटिव्ह सेट करत आहेत. इतके दिवस श्रीमंतांचं ऐकलं, आता अजित पवाराचं ऐका. फलटणमधून सचिन पाटलांना विजयी करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.