मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज साताऱ्यात; शिवरायांच्या वाघनखे दालनाचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन आणि वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घाटन आज शुक्रवार, दि. १९ राेजी साताऱ्यात होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री व काही मंत्री सातारा दाैऱ्यावर येत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे लंडनवरुन मुंबईत आली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ही वाघनखे साताऱ्यात आणण्यात आली. शुक्रवारी दुपारी सवा बारा वाजता या वाघनखांचे दर्शन आणि वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घटन छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात होणार आहे. त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिवशस्त्रशाैर्यगाथा- शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी येणार आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हेही उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री मुनगंटीवार यांचे शुक्रवारी सकाळी साडे दहाला पुणे येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते मोटारीने सातारकडे प्रयाण करतील. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दाैऱ्यावर असल्याने ते गुरूवारी रात्रीच दाखल होणार होते. मात्र, तेही आज सकाळी दाखल होणार आहेत.