सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीत लोकसभेची जागा आपल्याच गटातला मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. मात्र, हि जागा भाजपकडे गेली. आणि भाजपमधून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. सातारची जागा अजित पवार गटाकडे न मिळाल्याने गटातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरु उमटल्याचे दिसून आले. निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सातारची राज्यसभेची जागा हि आपल्या गटाकडे असणार असल्याचे मोठे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजितदादांनी केले आहे.
आज मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यासह महत्वाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत अजितदादांनी झालेली लोकसभा निवडणुकीसह येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणकोणत्या करावयाच्या महत्वाच्या गोष्टी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अजित अजित पवार म्हणाले की, साताऱ्याची राज्यसभेची जागा साताऱ्यालाच आणि आपल्याच मिळणार आहे.
दरम्यान, वाईत प्रचारसभेत अजित पवारांनी आमदार मकरंद पाटलांचे भाऊ नितीन पाटील यांना खासदार नाही केलं तर पवारांची औलाद सांगायचो नाही असे वक्तव्य केले होते. प्रत्येकाला मानसन्मान हवा असतो. कार्यकर्ता महत्त्वाचं असतो. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायला हवं. अशी भूमीका सर्वांनी मान्य करायला हावी. आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती.
मागचा वेळी 41 जागा भाजप युतिच्या होत्या तर विरोधक 7 जागेवर होते. त्यामुळं आपल्याला यांदा जागा कमी मिळाल्या. सातारची जागा जरी आपण दिली असली तरी आता त्या बदल्यात मिळणारी जागा सातारला देण्यात येणार आहे. ही सर्वांनी नोंद घ्यावी. सातारची राज्यसभेची जागा आपण सातारला देणार असल्याचे अजित पवार यांनी म्हंटले. तसेच आज पुन्हा सातारच्या राज्यसभेच्या जागेबाबतचा उल्लेख त्यांनी केला आहे.
विजयाचा उन्माद होऊ द्यायचा नाही, पराभवाने खचून जायचं नाही
अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ‘विजयाचा उन्माद होऊ द्यायचा नाही, पराभवाने खचून जायचं नाही. सर्वांनी मनापासून काम केलं आहे. राजकीय निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. २०१९ मध्ये विरोधकांना ७ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे आपल्याला जास्त जागा मागता आल्या नाहीत. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायला हवं. अशी भूमिका सर्वांनी मान्य करायला हवी. आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. येत्या १० जूनला आपल्याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत.आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. ते आल्याचा आपल्या पक्षाला नक्कीच फायदा होईल, असे अजित पवार म्हणाले.