सातारा प्रतिनिधी | राज्यभरात अनेक साखर सहकारी आणि खासगी कारखाने आहेत. त्या कारखान्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्या कारखान्यामढील एक सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला भारतीय शुगर्स संस्थेने सर्वोत्कृष्ट साखर कारखाना राष्ट्रीय पातळीवरील (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
रोख एक लाख रुपये, ट्रॉफी व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापूरमध्ये १८ जुलैला पुरस्काराचे वितरण होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिपथावर असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्याची दखल घेऊन राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २९ पुरस्कार मिळालेले आहेत.
या जाहीर झालेल्या ३० व्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. सहकारी साखर कारखान्याची दैनंदिन क्षमता ४५०० मेट्रिक टन, आसवनी क्षमता ४५ हजार लिटर्स केली आहे. शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट वेळेत देण्याची परंपरा राखली आहे.




