साताऱ्यात सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी केंद्र सुरु

Satara News 17 1

सातारा प्रतिनिधी । खरीप हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत आधारभुत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करणेकरीता खरीप हंगाम २०२४ मध्ये उत्पादीत सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत शेतक-यांकडुन ऑनलाईन नोंदणी करुन विक्री करणे करीता सातारा तालुका खरेदी विक्री संघ लि. मार्केट यार्ड सातारा, संघाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, … Read more

वाई तालुक्यात रब्बीची 50 टक्के पेरणी पूर्ण

Wai Crop News

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने त्याचा रब्बी हंगामातील पेरणीवर विपरीत परिणाम झालेला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. वाई तालुक्यात 50 टक्के पिकांचा पेरा झाला असून निसर्गाचा लहरीपणा बळीराजाच्या मुळावर उठल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामात बळीराजाचे नुकसान झाले. तसेच रब्बी हंगामात पेरण्या करण्यात मात्र अडचणी येताना … Read more

जावळीत पावसाचा पिकांना फटका; सोयाबीन, भात पिकांचे मोठे नुकसान

Crop News

सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. करहर, कुडाळ परिसरातील खर्शी, हातगेघर, महू, दापवडी, बेलोशी, काटवली, रुईघर आंदी परिसरातील खरीप हंगामातील सोयाबीनसह भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली … Read more

परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले; नुकसानीमुळे शेतकरी धास्तावला

Satara News

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक व्यावसायिकांचे साहित्य भिजल्याने नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दिवसभर पाऊस उघडीप देत असून, … Read more

सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाई संपली; तहान भागवणारे टँकर झाले बंद

Satara News 20241019 205004 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर यावर्षी मे महिन्यात २१८ गावे ७१६ वाड्या वस्त्यांसाठी २०८ टँकरचा धुरळ उडत होता. जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघे ६५ टक्केच पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे पूर्व दुष्काळी भागातील तलाव, विहिरी ही कोरड्या होत्या. तर पश्चिम भाग … Read more

मुसळधार पावसाचा तडाखा; कोयनेतून 10 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सुनोत्तर पाऊस सुरूच असून, कोयना पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठा १०५ टीएमसीवर पोहोचला. परिणामी, शुक्रवारी पहाटेच धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कोयनेतून सध्या १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.दरम्यान, काल मुसळधार पावसाने कराड आणि पाटण तालुक्यास … Read more

रात्री मुसळधार सकाळी उघडीप; हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण देशात आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. गुरुवारी रात्री पार्टीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. खासकरून कराड आणि पाटण तालुक्यात विजांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील आणखी पुढील तीन दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून रायगड, रत्नागिरी, पुणे, … Read more

अरुण कचरे यांचा राज्यपालांच्या हस्ते कृषिभूषण पुरस्काराने सन्मान

Arun kachare News 20241018 102449 0000

कराड प्रतिनिधी | प्रगतशील सेंद्रिय शेतकरी व खळे (ता. पाटण) गावचे सुपुत्र अरुण चंद्रकांत कचरे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले. वरळी (मुंबई) येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथील भव्य समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, … Read more

वाल्मीक पठारावर वाढला गव्यांचा मुक्त संचार; शेती पिकांचे नुकसान, दुचाकीवरून प्रवास झाला धोकादायक

Valmik Platu News 20241018 075839 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील गावाक्या आजूबाजूला घनदाट जंगल, डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या परिसरातील रस्त्यामध्ये दिवसा गव्यांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांची चिंता वाढली असून, दुचाकीवरून प्रवास धोकादायक बनला आहे. वाल्मीक पठारावरील अनेक गावांचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये करण्यात आलेला आहे. डोंगरदऱ्या, घनदाट जंगले यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांची … Read more

कोयना धरणातून पुन्हा 1,050 क्युसेक विसर्ग; पावसामुळे धरणात वाढली आवक

Koyna News 6

पाटण प्रतिनिधी । सातारा सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस अजूनही पडत असून पश्चिमेकडील कोयना धरणात दोन दिवसात पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी दुपारी एक युनिट सुरू करून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कोयना धरणात … Read more

औंधसह 21 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार : देवेंद्र फडणवीस

Water News 20241014 080824 0000

सातारा प्रतिनिधी | औंध उपसा सिंचन योजनेंतर्गत औंध पाणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, सचिव नार्वेकर यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले. यावेळी औंधसह 21 गावांचा पाणीप्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी आ. जयकुमार गोरे, अध्यक्ष … Read more

आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं!; ‘किसनवीर’च्या कार्यक्रमात मकरंद आबा पुन्हा बोलले

Makarand Patil News

सातारा प्रतिनिधी । किसनवीर कारखान्याच्या नव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतीपण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष व वाईचे आमदार मकरंद पाटील व त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनि उपस्थिती लावली होती. यावेळी ‘आम्ही जे जे बोललो ते ते खरं करून दाखवलं, असे महत्वाचे विधान आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी केले. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे … Read more