सातारा जिल्ह्यात 82 गावे अन् 404 वाड्यांत पाण्याचा ठणठणाट !

Satara Water Shortage 20230907 142335 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून टंचाईतही वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील 82 गावे आणि 404 वाड्यांच्या घशाला कोरड असून त्यासाठी 86 टॅंकर सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात 2017-18 साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास 200 हून अधिक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, मागील … Read more

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? : डाॅ. भारत पाटणकरांचा सवाल

Dr. Bharat Patankar 20230906 202745 0000 jpg

कराड प्रतिनिधी | टेंभू प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्प बाधीत शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. टेंभू उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन 20 वर्ष झाली तरी देखील भूसंपादन होऊन काही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अद्यापही … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे 13 जनावरांचा मृत्यू; बाधितांचा आकडा झाला 202

20230906 094633 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून आता बाधित पशुधनाचा आकडा 202 इतका झाला आहे. तर आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने लम्पीने बळी गेलेल्या पशुधनाची संख्या 13 झाली आहे. जिल्ह्यात बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढलेली आहे. बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढत असून सोमवारी चर्मरोग झालेल्या … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘हे’ गाव बनलय राज्‍यातील पहिले फळांचे गाव

Dhumalwadi Village News 20230904 091233 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मधाचे गाव, पुस्तकाचे गाव अशी गावे आपण पाहिली आणि एकली असतील. मात्र, जिल्ह्यात आता असे गाव तयार झाले आहे की त्या ठिकाणी फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातेय. गावातच फळाचे उत्पादन, गावातच त्यावर प्रक्रिया केली जात आहे. ते गाव म्हणजे फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे होय. या ठिकाणी विविध १९ प्रकारची … Read more

कराडचा जनावरांचा आठवडी बाजार बंद?; प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Animal News 20230903 202453 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या पशुपालक शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. कारण गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर या शेजारील जिल्हयात लंम्पी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या रोगाच्या प्रादुर्भाव सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी असल्याचे आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार, गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्णपणे बंदी … Read more

पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरण भरण्यासाठी ‘इतक्या’ TMC ची गरज

Koyna Dam 1

कराड प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक बंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगरमध्ये 24, नवजामध्ये 30 आणि महाबळेश्वरमध्ये 19 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सध्या धरणात 83.94 इतका समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, धरण भरण्यासाठी अजून 21 टीएमसी पाण्याची गरज आहे. वास्तविक कोयना धरणाची पाणी … Read more

वराडेत 3 बिबट्यांचे पुन्हा दर्शन; CCTV कॅमेऱ्यात कैद

Leopard News 20230818 100408 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील वराडे गावात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबटे सीसीटिव्ही कॅमेरेमध्ये कैद झाले होते. त्यानंतर आज शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात आलेले 3 बिबटे गावात फिरत असल्याचे पुन्हा CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे, ता. कराड येथील गावात मागील … Read more

कोयना धरण 80 टक्के भरले; ‘इतका’ TMC जमा झाला पाणीसाठा

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी। गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता पुन्हा दडी मारली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला अवघा 14 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अशात पावसाअभावी कोयनेत येणाऱ्या पाण्याची आवक घटली असली तरी धरणातील पाणीसाठ्याने 84 टीएमसीचा टप्पा पार केला आहे. कोयना धरणात सध्या 80.11 टक्के इतक्या … Read more

चांदोली अभयारण्य परिसरात 3. 4 रिश्टेर स्केलचा भूकंपाचा धक्का; कोयनेला जाणवली सौम्य लक्षणे

Earthquake News 20230816 102538 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात आज बुधवारी सकाळी 6.48 वाजता 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची सौम्य लक्षणे भूकंपाच्या केंद्र बिंदूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटण तालुक्याला जाणवली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटर खोल होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य … Read more

साताऱ्याच्या ऐतिहासिक महादरे तलावावर राहणार CCTV चा वाॅच

Mahadare Lake of Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराच्या पश्‍चिम भागातील ऐतिहासिक महादरे तलावाला आता संरक्षण मिळणार आहे. तसेच येथील पाणीसाठ्यावर देखील लक्ष ठेवण्यासाठी सातारा पालिकेच्या वतीने या ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यातील या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि देखभाल दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयाबाबतनागरिकांमधून समाधान व्यक्‍त केले … Read more

पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला; कोयनेचा पाणीसाठा झाला 83.35 TMC

Dams in Satara

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कमी झालेला पावसाचा जोर आता हळूहळू वाढू लागला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या नवजा येथे आठवडाभरानंतर सर्वाधिक 39 मिलीमीटरची पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढलयामुळे पाणीसाठा 83.35 टीएमसी इतका झाला आहे. सातारा जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धापासून ते आॅगस्ट महिन्याच्या पहिला आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी केला ‘या’ उपक्रमाचा शुभारंभ

Eknath Shinde launched Mission Bamboo Planting News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हयातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे याठिकाणी मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास … Read more