कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊसविकास संवर्धन पुरस्कार प्रदान; शरद पवारांच्या हस्ते गौरव

20240111 183214 0000 jpg

कराड प्रतिनिधी | रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील य. मो. कृष्णा कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने सन २०२२-२३ या गळीत हंगामातील “कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माजी कृषीमंत्री खासदार … Read more

पुसेगावात 4 वर्षांनंतर खिल्लार जनावरांचा बाजार

Pusegaon News 20240111 132348 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान भरणारा बैल बाजार लम्पी आणि इतर आजारांच्या सावटामुळे चार वर्षे भरला नव्हता. राज्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पुसेगावच्या बैल बाजाराला ७५ वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी येणारे बैल हे उत्कृष्ट दर्जाचे असतात, अशी ख्याती आहे. बाजारात जातिवंत पशुधनाची संख्या उल्लेखनीय असते. त्यामुळे महाराष्ट्रासह … Read more

‘रयत क्रांति’च्या आंदोलनाची दखल; बोंबाळवाडी तलावात पाणी

20240111 122143 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील बोबाळवाडी तलावामध्ये पाणी शिल्लक नसल्याने शामगाव परिसरातील शेतकऱ्यांची पिके वाळत चालली होती. चार दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शामगाव मधील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा प्रकल्प अभियंता राजन रेड्डीयार व अभियंता दादा नरवडे यांना निवेदन देत पाणी सोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर टेंभू प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी तलावामध्ये … Read more

पालघरमधील ऊसतोड मजूर सुखरूप स्वगृही, 4 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240110 165053 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पालघरमधील जव्हार, मोखाडा तालुक्यातून सातारा येथे उड तोडणीच्या कामाला गेलेल्या मजुरांची श्रमजीवी संघटनेच्या पथकाने सुखरूप सुटका केली. मजुरांवर अत्याचार केल्याप्रकरणी साताऱ्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात चार जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील एकूण १० कुटुंबे ऑक्टोबर २०२३ मध्ये सातारा येथे उसतोडीच्या कामाला गेले होते. यातील चार कुटुंबे … Read more

जिल्ह्यातील 90 हजार शेतकरी कृषी विभागाच्या योजनेसाठी झाले पात्र

Farmer News 20240109 204006 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत मिळत आहे. तरीही जिल्ह्यातील हजारो शेतकरी ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणापासून दूर राहिल्याने त्यांना लाभ मिळत नव्हता. यासाठी राज्य कृषी विभागाने सुमारे ९० हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जात असलेल्या … Read more

जिल्ह्यात पडला अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांत चिंतेचे ढग

Rain News 20240109 140434 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवकाळी ढग दाटले असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरात पावसाने हजेरी लावली. तर कराडला दुपारी अनेक ठिकाणीही अवकाळी पाऊस पडला. यामुळे दाट धुके निर्माण झाले होते. या धुक्याचा व ढगाळ वातावरणाचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सातारा शहरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात … Read more

रहाटणीत शेतकऱ्याने 40 गुंठ्यात घेतले 129 टन उसाचे उत्पन्न

20240108 180020 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील रहाटणी येथील प्रगतीशील शेतकरी व पोलीस पाटील देवीदास थोरात यांनी ४० गुंठ्यामध्ये १२९ टन एवढे आडसाली लागणी ऊसाचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. या गावातील सर्वांत जास्त उत्पन्न या शेतकऱ्याने काढले आहे. या परिसरातील गावाना उरमोडी पोटपाटाच्या पाण्याचे वरदान लाभले आहे. यामुळे या परिसरात पाण्याची कमतरता पडत नाही. तरीसुद्धा आधुनिक पद्धतीने … Read more

शामगावला टेंभूचे पाणी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू; सचिन नलवडेंचा इशारा

Karad News 17 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोम्बाळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइनद्वारे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असते. परंतु टेम्भू योजनेचे पाणी बोबळवाड़ी तलावात सोडले नसल्याने हा तलाव आटला आहे. या कारणाने आज रयत क्रांती संघट्नेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे … Read more

राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो 5 जानेवारीपर्यंत अर्ज करा : भाग्यश्री फरांदे

Satara News 42 jpg

सातारा प्रतिनिधी । एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 करीता मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे जानेवारी 2024 मध्ये आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला लाभार्थी यांनी 5 जानेवारी 2024 पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. दरवर्षी … Read more

नैसर्गिकरित्या उत्पादित कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : जितेंद्र डुडी

Satara News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात नुकतीच ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापरात जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचे काम कृषी विभागाने करावे; त्यांनी नैसर्गिकरित्या उत्पादित केलेल्या कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासन … Read more

टेंभू सुधारित योजनेमुळे 41 हजार 003 हेक्टर क्षेत्राला पाणी; सातारासह ‘या’ जिल्ह्यातील गावांना होणार फायदा

Tembu Revised Scheme News jpg

सातारा प्रतिनिधी । आशिया खंडातील सर्वात पहिली जलउपसा सिंचन योजना टेंभू उपसा सिंचन योजना हा प्रकल्प 1996 साली सुरू झाला. महत्वकांशी असलेल्या या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ७ हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाकडून हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र … Read more

वांग-मराठवाडी धरणाच्या बांधकामास मुहूर्त सापडला

Wang Marathwadi Dam News jpg

पाटण प्रतिनिधी । वांग – मराठवाडी धरणाच्या उर्वरित कामास कधी सुरुवात होणार? अशी विचारणा केली जात असताना आता धरणाच्या कामासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्यक्षात कामाला मुहूर्त लागला असून कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. धरणाचे काम अंतिम टप्यात आले असून, काही महिन्यांतच धरणाचे काम पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संघर्षात असलेले मराठवाडी धरण कधी … Read more