गोठणेत रानगव्याच्या हल्ल्यातील जखमी वृद्धाचा मृत्यू

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना भागातील गोठणे येथे रानगव्यानी हल्ला करून एका वृद्धाला जखमी केले होते. त्या जखमी झालेल्या दगडू रामचंद्र सुर्वे (वय 75) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दगडू सुर्वे हे आपल्या मालकीच्या क्षेत्रात गुरे चारायला गेले असता, त्यांच्यावर रानगव्याने हल्ला केला होता. रानगव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुर्वे यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा … Read more

खंडाळा-फलटणचे पाणी आज होणार बंद, नेमकं काय आहे कारण?

Khandala Phaltan News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्यात विहित मंजूर पाणी सुरू आहे. ते संपताच आज बंद करण्यात येणार आहे. तसेच लाभक्षेत्रात चालू आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वाई तालुक्यातील धोम धरणातील बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटणला पाणी सोडण्यात … Read more

जिल्ह्यात टँकरच्या संख्येत झाली वाढ, ‘इतक्या’ गावांना पाणीपुरवठा

Satara News 50 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील उष्माघाताचा झळा हळूहळू जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी कडक उन्ह देखील पडत आहे. दरम्यान, मागील वर्षांप्रमाणे यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नसल्यामुळे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार आहे. जिल्ह्यात अजूनही काही गावात पाण्याअभावी टँकर सुरु असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. … Read more

गौतम अदानी जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी उभारणार जलविद्युत प्रकल्प?

Patan News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । उद्योगपती गौतम अदानींची महाराष्ट्रातील ज्या ठिकाणावर अथवा प्रकल्पावर नजर पडली कि तो त्यांना मिळणारच अशी सध्या परिस्थिती आहे. राज्यातील अनेक मोठे प्रकल्प सध्या अदानींच्या ताब्यात आहेत.आता अदानींच्या समूहाला महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेत तीन जलविद्युत प्रकल्प करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. हि परवानगी देताना केंद्राने अनेक कायद्यांना धाब्यावर बसवले आहे. आर्टिकल … Read more

वांग मध्यम प्रकल्प – जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा – अनिल पाटील

Satara News 35 jpg

सातारा प्रतिनिधी | वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित जिंती व निगडे ता.पाटण (जि. सातारा) गावातील प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित गावातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी रोख रक्कम द्यावयाच्या प्रस्तावाबाबत व तारळी प्रकल्पामध्ये 100 टक्के बाधीत … Read more

‘या’ ब्रिटिशकालीन तलाव प्रश्नी प्राणीमित्रांसह मच्छीमारांनी घातलं जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडं

Leke News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत. त्यासह सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील सर्वात महत्वाचा मात्र दुर्लक्षित असलेलया सातारा, सांगली आणि सोलापूर जिह्याच्या सीमारेषेवर असणारा ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. हा तलाव आटण्याच्या मार्गावर असून म्हसवड मध्यम प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या राजेवाडी तलावात आज फक्त उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राजेवाडी, … Read more

धोमचा उजवा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया

Dhom Canal jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात अगोदरच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. पावसाअभावी धरण, तलावयात कमी प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहान करण्यात आले असताना वाई तालुक्यातील धोम उजवा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. मागील पन्नास दिवसांपासून धोम उजव्या कालव्यात 190/200 क्युसेसने पाण्याचा … Read more

कोयनेतील बुडीत क्षेत्रातील 25 बंधाऱ्यांना मान्यता देत मुख्यमंत्र्यांकडून ‘इतक्या’ कोटींचं बजेट

Patan News 20240202 202638 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | राज्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भातील टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. छोट्या बंधाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. राज्यभरात छोट्या बंधाऱ्यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली असून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील २५ बुडीत बंधाऱ्यांना विशेष बाब म्हणून त्यांनी मान्यता देखील दिली आहे. मुंबईतील सह्याद्री … Read more

मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाण्याचा सुरु झाला विसर्ग

Marathwadi Dam News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात होती. आता पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देत बुधवारपासून धरणाच्या सिंचनद्वारातून वांग नदीपात्रात तातडीने विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात पाणी येऊ लागल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा … Read more

“सत्तेची मस्ती या अर्थसंकल्पातून दिसते”; ‘बळीराजा’ संघटनेच्या पंजाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

Karad News 34 jpg

कराड प्रतिनिधी । अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षात मोदी सरकारने देशातील जनतेसाठी केलेल्या कामाचे वाचन केलं. आमचं सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असून २०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ असं सीतारामन यांनी म्हंटल. मात्र, केंद्राच्या अर्थसंकल्पावर बळीराजा … Read more

कोयनेतील वेळे-मळेच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास केंद्र शासनाकडून मिळाली अंतिम मान्यता

Koyna News 20240201 083705 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोयना अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनाचा प्रश्न 35 वर्ष पासुन प्रलंबीत होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज यांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नांमुळे दोन्ही प्रस्तावास दि. 29 जानेवारी 2024 रोजी केंद्र शासनाकडून अंतीम मान्यता प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन अधिसुचना क्रमांक उब्नुएलपी – 1085 / सीआर/ … Read more

सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे साताऱ्यात आंदोलन

Satara News 20240201 060428 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनंतर शेतकरी संघटना व शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या नोटीसीचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटीस रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे. याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. … Read more