कोयनेतून कृष्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग;कृष्णाकाठाच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Karad News 32 1 jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना धरणातून आज मंगळवारी दुपारपासून २ हजार ६०० क्युसेकने पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले. कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सातारासह सर्व जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पाऊस नसल्यामुळे सातारासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांनी … Read more

राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे; 4 साखर कारखाने बंद

Satara News 89 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम हा सध्या समाप्तीच्या मार्गावर आहे. ऊस गाळपामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावतात ते कारखाने. चालू वर्षी राज्यात २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते त्यापैकी ४ साखर कारखाने बंद झाले आहेत. दररोज राज्यात ९ लाख ४६ हजार ६५० मेट्रिक टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत असून चालूवर्षी ऐन … Read more

जिल्ह्यातील 3 शेतकरी करणार परदेशातील शेतीची पाहणी; लॉटरी पद्धतीने झाली निवड

Satara News 20240220 144233 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाकडून शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती तसेच तेथे शेती कशी केली जाते, अवजारे कोणती आणि त्याचा कसा वापर केला जातो, याची माहिती होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने परदेश अभ्यास दौरा नियोजित केला असून यासाठी सातारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने … Read more

“…म्हणून मी हेलिकॉप्टरने शेतात जातो”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Satara News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पॅराग्लायडिंग साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच्या पारितोषिक वितरणास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. माझ्यावर हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा मुख्यमंत्री अशी टीका करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करत फिरण्यापेक्षा शेतात जाऊन शेती करणे … Read more

खटाव भागात ज्वारी काढणीला पडतोय मजुरांचा तुटवडा

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यातील खटाव तालुक्यासह कातरखटाव परिसरातील शिवारात ज्वारी काढणीला वेग आला आहे. मात्र, या ठिकाणी मजुराच्या तुटवड्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे. सध्या मजूर मिळत नसल्याने पैरा करून रानावनात ज्वारी काढणीची कामे केली जात आहेत. गेली दोन वर्षे झाली अत्यल्प तर काही भागात पावसाने हुलकावणी देत कमी हजेरी लावल्याने मागास … Read more

राज्य शासनाकडून GR जारी; जिल्ह्यातील आणखी 12 महसूल मंडलात दुष्काळ

Satara News 76 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे राज्य शासनाकडून दोन तालुके आणि त्यानंतर इतर तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर करुन उपायोजनाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी जिल्ह्यातील नवीन आणि पर्जन्यमापक न बसविलेल्या १२ मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. गेल्यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार … Read more

फ्रान्सच्या अभ्यासिकेने दिली जिल्ह्यातील दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या गावाला भेट

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील काही गावात व वाड्या वस्त्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाशी पाणी टंचाईशी दोन हात करत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाण्याचे संचयन करणारी गावे देखील आहेत. या गावांना सध्या परदेशातीलअभ्यासकांनी नुकतीच भेट दिली आहे. फ्रान्स येथून … Read more

मध केंद्र योजनेअंतर्गत एक दिवसीय मेळाव्याचे आयोजन

Satara News 64 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या योजनांची माहिती व फायदे जास्तीत जास्त लोकांना व्हावी, यासाठी मंडळाची माहिती देण्यासाठी दि. 21 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये शासनाचे कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती, इत्यादी शासकीय कार्यलयांचा … Read more

बिबट्याच्या 2 पिल्लांचे आईसोबत घडले पुनर्मिलन

Karad News 22 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मालखेड येथील शेतकरी रामचंद्र ज्ञानू मोरे यांच्या कूळकी नामक शिवारात बुधवारी ऊसतोड सुरू होती. यावेळी ऊसतोड सुरु असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या सरीमध्ये २ बिबट्यांची पिल्ले आढळून आली. याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाच्या प्रयत्नानंतर दोन पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्यात यश आले. याचा … Read more

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसह प्रक्रिया उद्योग करुन स्वतःची विक्री व्यवस्था उभी करावी : भाग्यश्री फरांदे

Satara News 63 jpg

सातारा प्रतिनिधी । डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नैसर्गिक शेतीला चांगला भाव मिळत असल्याने सलग ३ वर्षे नैसर्गिक शेतीविषयी कृषि विभाग शेतक-यांना मार्गदर्शन करून आपल्या शेतीचे सर्टिफिकेशन करणार आहे. अशा प्रमाणित शेतमालाचे उत्कृष्ट पॅकिंग व ब्रँण्डिंग केल्यास त्यास जागतिक बाजरपेठेत चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे … Read more

जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ हेक्टरवर झाले बांबू लागवड

Satara News 20240216 084437 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात ऊसासह अनेक पिके घेतली जातात. या पिकांमध्ये आता बांबू या पिकाची देखील अधिक भर पडली आहे. जिल्ह्यात बांबू लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहे. या वर्षासाठी 5 हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू केले आहे. 3 हजार 339 हेक्टर क्षेत्रावरील लागवडीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत … Read more

टंचाई काळात उपसाबंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करा : जितेंद्र डुडी

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. पुढील काळात पाणी टंचाईचे संकट बिकट होऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या विभागांना टंचाई निवरणार्थ उपायोजनांची जबाबदारी दिली आहे, अशा विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. तसेच टंचाईच्या ठिकाणी उपसा बंदी निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी. उपसा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर … Read more