कोचरेवाडीत भीषण आगीत 8 गवताच्या गंजी खाक; 3 शेतकऱ्यांचे 1 लाख 35 हजारचे नुकसान

Patan News 13 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या कोचरेवाडी येथील आठ गंजींना भीषण आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या आगीमध्ये 3 शेतकऱ्यांचे सुमारे 1 लाख 35 हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यापासून सुमारे 32 किमी अंतरावर डोंगरमाथ्यावर कोचरेवाडी हे गाव वसले आहे. गावात साधारण 109 कुटुंबे राहतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने … Read more

येरळवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रात उपसा बंदी, सिंचन विभागाने जप्त केल्या 18 विद्युत मोटारी

Yeralwadi Dam News jpg

सातारा प्रतिनिधी | सध्या खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत येरळवाडी धरण डेड स्टॉकवर अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा बंदी करण्यात आली आहे. तरीही काहीजण राजरोसपणे मोटारींच्या साहाय्याने रात्री पाणी उपसा करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. संबंधितांना सूचना देऊनही उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी … Read more

वाई पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत बांबू लागवड केलेल्या शेतीची पाहणी

Farmer News jpg

सातारा प्रतिनिधी । महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाचे माध्यमातून तालुक्यातील लगडवाडी येथील शेतकरी शरद मोरे यांच्या वतीने बांबू लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शरद मोरे यांना मजुरीच्या रूपाने सहा महिन्यांमध्ये ४५ हजार रुपये इतके मजुरी मिळाली. संबंधित शेतकऱ्याच्या बांबू लागवड केलेल्या या ठिकाणची वाई पंचायत समितीची कृषी विभागाचे विस्तार … Read more

अन् पाणी प्रश्नासाठी सुरु केलेले उपोषण पुसेसावळीतील ग्रामस्थांनी घेतले मागे

Pusesavali News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह परिसरात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने पुसेसावळी ग्रामस्थांनी वडूज येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, प्रशासनाच्या लेखी व सकारात्मक आश्वासनानंतर एका दिवसात हे उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या निर्णयानंतर या परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जनावराच्या पिण्याचा व चाऱ्याचा उपलब्धतेसाठी … Read more

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : डॉ. पी. जी. पाटील

20240324 104339 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बोरगाव, ता. सातारा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठक (दि. 22) उत्साहात पार पडली. बैठकीत “आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी जलसंधारणावर भर द्यावा,” असे मत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी … Read more

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील गावकऱ्यांची 142 टॅँकर भागवतायत ‘तहान’

Satara News 20240323 213041 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यास टंचाईच्या झळा बसत असल्याने सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. … Read more

जिल्ह्यातील दोन तालुक्यात समावेश होणाऱ्या ‘या’ गावातील पाण्याचा तिढा सुटला

Jangalwadi News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । आपल्या कानावर ‘एक घाव, दोन तुकडे’, अशी म्हण अनेकदा पडली असेल. मात्र, अशीच म्हण सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणाऱ्या एका गावाबाबत लागू होतेय. सातारा जिल्ह्यातील जंगलवाडी हे असं गाव आहे कि याचा निम्मा कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश आहे. डोंगरावर वसलेल्या आणि सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या … Read more

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित 2 तालुक्यातील 5 गावे अन् 3 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू

Satara News 2024 03 23T115153.099 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई महसूल उपविभागांतर्गत वाई, खंडाळा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील ४९ आणि खंडाळा २५ अशी तब्बल ७४ गावे टंचाईग्रस्त घोषित असून सध्या वाई तालुक्यातील २ गावे व ३ वाड्या, तर खंडाळा तालुक्यातील ३ गावांमध्ये … Read more

अखेर तारळी धरणाचे पाणी सोडले, लवकरच मसूर विभागात होणार दाखल

Karad News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । तारळी धरण उभारणीस 1995 साली मंजूरी मिळाल्यानंतर त्याचे काम 2010 साली पुर्ण झाले. या धरणामध्ये 5.83 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून त्यातील 1.83 टीएमसी पाणी नदीवाटे शेतीसाठी व पिण्यासाठी वापरात येत होते. उर्वरीत 4 टीएमसी पाणी वापरात येत नव्हते. दरम्यान, मसूर व कोपर्डे हवेली विभागातील शेतकऱ्यांनी पिकांना पाणी मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे … Read more

पाणीप्रश्न संवाद मेळाव्यात औंधसह 20 गावांना 3 वर्षांत पाणी प्रश्न सुटण्याबाबत चर्चा

Khatav News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक प्रकारचे मेळावे होतात. मात्र, जिल्ह्यात इतिहासात पहिलाच खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा इतिहासात प्रथम खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा खटाव तालुक्यातील औंध येथे नुकताच पार पडला. तालुक्यातील पाणी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी भाजप आमदार जयकुमार गोरे यांना खुले निमंत्रण दिले होते. या मेळाव्यास उपस्थित राहत आमदार … Read more

माण- खटावच्या टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतापले; थेट अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 22T174519.714 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. अशात पाणी पुरवठा करण्याची मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच दहिवडी कॉलेज दहिवडीमधील कर्मवीर सभागृहात माण- खटाव तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत ‘माण-खटावमधील टंचाईची परिस्थिती येथील अधिकारी वर्गाने गांभीर्याने घ्यावी, अन्यथा मी तुम्हाला गांभीर्याने घेईन,’ असा स्पष्ट … Read more

कराड तालुक्यात ऊस लागवड क्षेत्र ‘इतक्या’ टक्क्यांनी घटणार; 44 पाझर तलाव आटले

Karad News 79 jpg

कराड प्रतिनिधी । यंदा कृष्णा व आरफळ कालव्याला पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांची होरपळ सुरू आहे. शेतीच्या पाण्याची स्थिती बिकट होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून ऊस शेतीकडे पाठ फिरवली जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ५९ पाझर तलावांपैकी ४४ पाझर तलाव आटले आहेत. शेतकऱ्यांनी चारा, भाजीपाला, उन्हाळी भुईमूग या पिकांचा पर्याय निवडला आहे. शेतीला पुरेसे पाणी मिळणार नसल्याने … Read more