सातारा जिल्ह्यातील धरणांतून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू

Koyna News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प काठापर्यंत भरले असून त्यामध्ये १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे. तसेच आठवड्यापासून कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, … Read more

सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून 7 हजार 561 हेक्टरवर कांदा लागवड

Satara News 15

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या कांद्याचे दर चांगलेच वाढले असल्याने गृहिणीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कांदा लागवडीचे प्रमाण देखील वाढले आहे. सहा महिन्यांत कांद्याचे दर समाधानकारक राहिल्याने जिल्ह्यात कांदा पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. यामुळे बियाणे, रोपाची दरात वाढ झाली आहे. जिल्ह्यात सात हजार ५६१ हेक्टरवर कांदा लागवड झाली … Read more

बावकलवाडीतील पठ्ठ्यानं घेतलं एकरी 106 टन ऊसाचे उत्पादन

Bawakalwadi Farmer News

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील बावकलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी समीर जाधव यांनी 86032 उसाची रोप लागवड करून एकरी 106 टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायद्याची ठरते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. याचा शेतकर्‍यांनी आदर्श घ्यावा. सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी समीर जाधव यांच्या विक्रमी ऊस उत्पादनाची दखल घेत … Read more

महाबळेश्वरची लालचुटूक स्ट्रॉबेरी झळकली टपाल कॅन्सलेशनवर!

Mahabaleshwar Strawberries News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. मुंबई येथील टपाल कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात या कॅन्सलेशनचे अनावरण करण्यात आल्याने महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली गेली. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान विकसित झाले. … Read more

सव्वा टनाचा युवराज अन् 7 फूट उंचीचा सोन्या ठरला आकर्षण; कराडच्या कृषी प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस

Karad News 20241210 121117 0000

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीने दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त भरवलेल्या कृषी, औद्योगिक प्रदर्शनात जातीवंत जनावरे शेतकऱ्यांचे आकर्षण ठरली आहेत. गडहिंग्लजमधील मुऱ्हा जातीचा सव्वा टनाचा रेडा आणि जतच्या खिलार सोन्या बैलाने सर्वांचे लक्ष वेधले. कराडमध्ये सुरू असलेल्या यशवंत कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन चांगलेच बहरल्याचे पहायला मिळाले. प्रदर्शनात शेतीतील आधुनक तंत्रज्ञान तसंच पशु … Read more

कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन राज्यातील कृषी व तंत्रज्ञानाला दिशा देणारे : खा. नितीन पाटील

Karad News 13

कराड प्रतिनिधी । कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन राज्यातील कृषी व तंत्रज्ञानाला दिशा देणारे ठरले आहे. या प्रदर्शनाची उदात्त हेतूने विलासराव पाटील – उंडाळकर यांनी पायाभरणी केली. त्यांचा आदर्श घेवून हे प्रदर्शन दिवससेंदिवस बहरत चालले आहे, असे सांगून या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवी संकल्पना राबवली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा व कृषी विकासाचा मूळ हेतू घेऊन प्रदर्शन … Read more

मोरणा विभागामध्ये बिबट्याची पुन्हा डरकाळी; पशुपालनासह शेतीपूरक व्यवसाय अडचणीत

Patan News 20241207 135154 0000

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोरणा विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. बिबट्याकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोरणा – विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे … Read more

15 दिवसांत मागण्या मान्य न केल्यास दूध वाहतूक बंद करणार; दूध उत्पादकांचा इशारा

Karad News 20241207 120713 0000

सातारा प्रतिनिधी | येत्या १५ दिवसांत दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रीय किसान दिनापासून (दि. २३) जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलनासह जिल्ह्यासह अन्‍य जिल्ह्यांतील सर्व प्रकारची दूध वाहतूक बंद करण्याचा इशारा दूध उत्पादकांच्या बैठकीत देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली दूध दराबाबत बैठक झाली. … Read more

कराडच्या यशवंत कृषी प्रदर्शनाच प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन; उद्या मुख्य सोहळा…

Karad News 20241206 183541 0000

कराड प्रतिनिधी | शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १९ वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आज (शुक्रवार) सायंकाळी कराड तालुक्यातील २० प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते दिमाखात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रथमच महिला शेतकऱ्याचा समावेश होता. व सर्व शेतकऱ्यांना मानाचे फेटे बांधण्यात आले होते. प्रारंभी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह … Read more

यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन उद्यापासून होणार खुले; सायंकाळी शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारीक उद्धघाटन

Karad News 12

कराड प्रतिनिधी । शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणारे १९ वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन उद्या शुक्रवार दि. ६ रोजीपासून खुले होणार असल्याची अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे यांनी दिली. उद्यापासून दि. १० डिसेंबर या चार दिवसात कृषीचा जागर पहायला मिळणार आहे. कमी कालावधीत बाजार समितीने … Read more

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकाडो, मसाला पिकांना मिळणार अनुदान

Satara News 7

सातारा प्रतिनिधी । कृषी विभागाच्या वतीने फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. या योजनेतून ड्रॅगन फ्रूट, अॅवोकॅडो, मसाला पिकांना अनुदान देण्यात येणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या फलोत्पादन … Read more

कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात यंदा ‘या’ 2 गोष्टी ठरणार मुख्य आकर्षण

Karad News 10

कराड प्रतिनिधी । शेती उत्पन्न बाजार समिती, कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशू – पक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. विना खांबावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये विविध स्टॉल साकारण्याची हातघाई सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या प्रदर्शनात शासन कृषी विभागाने कृषी विभागाच्या मंडपात फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे. तर या प्रदर्शनातील मुख्य … Read more