सातारा जिल्ह्यातील ‘किसनवीर’ अन् ‘खंडाळा’ कारखान्यांना एनसीडीसीकडून 500 कोटी रुपये कर्ज मंजूर

Satara News 20240703 165524 0000

सातारा प्रतिनिधी | आर्थिक गर्तेत सापडलेल्या सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा येथील किसनवीर-खंडाळा साखर कारखान्याला एनसीडीसीकडून 500 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. भ्रष्ट व नियोजनशून्य कारभारामुळे किसनवीर कारखाना आर्थिक गर्तेत सापडला होता. कारखान्यावर सुमारे एक हजार कोटींचे कर्ज असल्याने हा कारखाना लिलावाच्या प्रक्रियेत जातो की काय, अशी अवस्था … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार;धरणात गेल्या 24 तासात ‘इतक्या’ TMC ची पाण्याची वाढ

Koyna News 20240703 111720 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची कालपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वर परिसरात 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसीची पाण्याची वाढ झाली असून, एकूण पाणीसाठी हा 23 टीएमसी झाला आहे. सध्या कोयना धरणात … Read more

कृष्णा कारखान्याकडून व्हॅट, GST पोटी 122.92 कोटींचा भरणा, वस्तू व सेवाकर विभागाने केला सन्मान

Karad News 20240702 222520 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यात महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी १२२.९२ कोटी रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे … Read more

शेतकऱ्यांची शेतीपंपाची सरसकट वीजबिल माफी करावी; कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

Karad News 20240702 165559 0000

कराड प्रतिनिधी | नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला,यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे राज्यशासनाने आश्वासन दिले आहे,तसेच ७.५० साडेसात अश्व शक्ती पर्यंतची थकीत वीजबिले माफ करण्याचे जाहीर केले आहे.मात्र राज्य सरकारचे हे धोरण अन्यायकारक असून सरसकट वीजबिल माफी ची मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन केली आहे. यावेळी शिवाजी पाटील, निवासराव … Read more

कास धरणाच्या पाणी पातळीत 5 फुटांनी झाली वाढ

Kas News 20240702 085412 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या पश्चिमेस कास धरणात मान्सूनपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस ४५ फूट पाणीसाठा शिल्लक राहिला होता. सध्या परिसरात मान्सूनची जोरदार हजेरी असल्याने मागील पंधरवड्यात पाणीपातळीत एका फुटाने तर चालू आठवड्यात संततधारेसह अधूनमधून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पाणीपातळीत चार फूट वाढ होऊन एकूण ५० फूट पाणीसाठा धरणात झाला आहे. कास धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा … Read more

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढविणे सहज शक्य : दत्तात्रय गायकवाड

Phalatan News 20240701 190326 0000

सातारा प्रतिनिधी | कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये फलटण तालुका अग्रेसर असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आर्थिक उन्नती साधने सहज शक्य आहे, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सतत पाठीशी आहे.असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले. शेरेचीवाडी(ढवळ) ता. फलटण येथे हरितक्रांतीचे प्रणेते … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna news 20240701 123810 0000

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 97 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 72 आणि महाबळेश्वरला 155 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची चांगली आवक सुरू झाली आहे. मागील 3 आठवड्यापासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार … Read more

गावठाण हद्दीत आजपासून शंभर वृक्षांची लागवड; जुलैअखेर राबवली जाणार मोहीम

Satara news 20240701 091858 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दि. १ ते २८ जुलैअखेर महाराष्ट्र कृषिदिन ते जागतिक संवर्धन दिनापर्यंत वृक्षारोपण मोहीम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. गावठाण परिसरात सुमारे १०० झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात मार्च २४ ते मे २४ या कालावधीत उच्चांकी तापमान झाले होते. वृक्ष लागवड कालाधीत ग्रामपंचायतींनी … Read more

कासच्या पाणीकपात अन् अपुरा पाणीपुरवठ्यामुळे सातारकर झाले हैराण

Satara News 20240630 140235 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराची लाईफलाईन असलेल्या कास तलावामध्ये तब्बल 45 फूट पाणीसाठा आहे. अजूनही म्हणावा तसा पावसाने अपेक्षित जोर धरलेला नसला तरी मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या पूर्व मोसमी दमदार पावसाने कासची पाणी पातळी सहा फुटाने वाढली आहे. तरीही सातारा नगरपालिका पाणी कपातीचे वेळापत्रक मागे घ्यायला तयार नाही. परिणामी कास तलावातून वारंवार होणारा अपुरा पाणीपुरवठा … Read more

कराड शेती उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती विजयकुमार कदम यांचा राजीनामा

Karad News 20240630 121435 0000

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत चांगल्याच राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. सभापती विजयकुमार कदम यांनी शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. सहकार उपनिबंधक यांच्या मंजुरीनंतर राजीनामा अंतिम होऊन नव्या सभापतीची निवड करण्यात येणार आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीतील सत्ताधारी … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna Dam News 20240630 110257 0000

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नवजा येथे 55 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 73 आणि महाबळेश्वरला 54 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. मागील 20 दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार … Read more

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; शेतकऱ्यांनी दिली बाजरीसह भाताला अधिक पसंती

Satara News 26 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सून चांगला बरसल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. जून महिना संपण्यापूर्वीच १ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ५० इतके झाले आहे. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणीचा अंदाज आहे. तर सध्या भात लागण, बाजरी, ज्वारी, मका पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे … Read more