जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील गावकऱ्यांची 142 टॅँकर भागवतायत ‘तहान’

Satara News 20240323 213041 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यास टंचाईच्या झळा बसत असल्याने सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. … Read more

जिल्ह्यातील दोन तालुक्यात समावेश होणाऱ्या ‘या’ गावातील पाण्याचा तिढा सुटला

Jangalwadi News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । आपल्या कानावर ‘एक घाव, दोन तुकडे’, अशी म्हण अनेकदा पडली असेल. मात्र, अशीच म्हण सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणाऱ्या एका गावाबाबत लागू होतेय. सातारा जिल्ह्यातील जंगलवाडी हे असं गाव आहे कि याचा निम्मा कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश आहे. डोंगरावर वसलेल्या आणि सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या … Read more

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित 2 तालुक्यातील 5 गावे अन् 3 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू

Satara News 2024 03 23T115153.099 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई महसूल उपविभागांतर्गत वाई, खंडाळा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील ४९ आणि खंडाळा २५ अशी तब्बल ७४ गावे टंचाईग्रस्त घोषित असून सध्या वाई तालुक्यातील २ गावे व ३ वाड्या, तर खंडाळा तालुक्यातील ३ गावांमध्ये … Read more

अखेर तारळी धरणाचे पाणी सोडले, लवकरच मसूर विभागात होणार दाखल

Karad News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । तारळी धरण उभारणीस 1995 साली मंजूरी मिळाल्यानंतर त्याचे काम 2010 साली पुर्ण झाले. या धरणामध्ये 5.83 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून त्यातील 1.83 टीएमसी पाणी नदीवाटे शेतीसाठी व पिण्यासाठी वापरात येत होते. उर्वरीत 4 टीएमसी पाणी वापरात येत नव्हते. दरम्यान, मसूर व कोपर्डे हवेली विभागातील शेतकऱ्यांनी पिकांना पाणी मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे … Read more

पाणीप्रश्न संवाद मेळाव्यात औंधसह 20 गावांना 3 वर्षांत पाणी प्रश्न सुटण्याबाबत चर्चा

Khatav News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक प्रकारचे मेळावे होतात. मात्र, जिल्ह्यात इतिहासात पहिलाच खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा इतिहासात प्रथम खुला पाणीप्रश्न संवाद मेळावा खटाव तालुक्यातील औंध येथे नुकताच पार पडला. तालुक्यातील पाणी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी भाजप आमदार जयकुमार गोरे यांना खुले निमंत्रण दिले होते. या मेळाव्यास उपस्थित राहत आमदार … Read more

माण- खटावच्या टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संतापले; थेट अधिकाऱ्यांना दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 22T174519.714 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. अशात पाणी पुरवठा करण्याची मागणी जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच दहिवडी कॉलेज दहिवडीमधील कर्मवीर सभागृहात माण- खटाव तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत ‘माण-खटावमधील टंचाईची परिस्थिती येथील अधिकारी वर्गाने गांभीर्याने घ्यावी, अन्यथा मी तुम्हाला गांभीर्याने घेईन,’ असा स्पष्ट … Read more

कराड तालुक्यात ऊस लागवड क्षेत्र ‘इतक्या’ टक्क्यांनी घटणार; 44 पाझर तलाव आटले

Karad News 79 jpg

कराड प्रतिनिधी । यंदा कृष्णा व आरफळ कालव्याला पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांची होरपळ सुरू आहे. शेतीच्या पाण्याची स्थिती बिकट होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून ऊस शेतीकडे पाठ फिरवली जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ५९ पाझर तलावांपैकी ४४ पाझर तलाव आटले आहेत. शेतकऱ्यांनी चारा, भाजीपाला, उन्हाळी भुईमूग या पिकांचा पर्याय निवडला आहे. शेतीला पुरेसे पाणी मिळणार नसल्याने … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील भागात वाढली दुष्काळाची दाहकता; टँकरने पाणीपुरवठा सुरु

Satara News 2024 03 20T141733.298 jpg

सातारा प्रतिनिधी । नेहमी दुष्काळग्रस्त असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या दुष्काळाची दाहकता चांगलीच वाढली आहे. तसेच जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या पूर्वेकडील भागासही दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सध्या फलटण तालुक्यात १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून खंडाळा तालुक्यात १ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. जिल्ह्यात पूर्वे आणि पश्चिम भागात वाढलेल्या दुष्काळाच्या दाहकतेमुळे … Read more

राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींची कर्जहमी; सातारा जिल्ह्यातील 2 कारखान्यांचा समावेश

Satara News 2024 03 20T135111.796 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांना तब्बल १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्या अगोदर मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक 350 ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा

Satara News 2024 03 19T171535.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ३५० ठिकाणी ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल आणि मे … Read more

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन सेंद्रिय शेती करावी : विकास बंडगर

Satara News 2024 03 19T162926.904 jpg

सातारा प्रतिनिधी । बोरगाव कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यावतीने नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख, कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करावे व सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रियेत भाग घ्यावा जेणेकरून उत्पादित शेतमाल व प्रक्रिया युक्त पदार्थ … Read more

कालव्यातून पाणी उपसा प्रतिबंधासाठी जलसंपदा विभागाचे महत्वाचे आवाहन

Satara News 2024 03 18T182947.453 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात कोरेगाव, माण, खटावसह काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या तालुक्यात समन्यायी पद्धतीने सिंचनासाठी आवश्यक पाणी विसर्ग पोहचण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याचे लक्षात घेत सिंचन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे तालुक्यातील कालव्याच्या दोन्ही बाजूला आवश्यकतेनुसार ३० मीटर ते ५० मीटर अंतरावर कलम १४४ आदेश लागू … Read more