सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये ‘इतका’ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक!

Water News 20240403 153503 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. उरमोडी धरणात तर २० टक्केच पाणीसाठा राहिला आहे.तर कोयना धरणात ५३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने समाधानाची स्थिती आहे. दरम्यान, सध्या प्रमुख सहा धरणांत ६९ टीएमसी … Read more

जिल्ह्यात दुपारी वाढता पारा; सायंकाळी अवकाळीच्या धारा..!

Satara News 20240402 123734 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरवासीयांना गत आठवड्यापासून कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागत असतानाच शनिवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी धारा पडल्या. यामुळे उकाडा कमी झाला. तर या पावसात भिजण्याचा आनंद बच्चे कंपनीने घेतला. मात्र, सद्या दिवसा कडक पारा आणि सायंकाळ झाली की अवकाळीच्या जलधारा अशी परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता … Read more

तळबीड येथे विहिरीत पडला बिबट्या, अचानक बाहेर येत ठोकली धूम…

Leopard News 20240329 141400 0000 jpg

कराड प्रतिनिधी | तळबीड ता. कराड येथील जानाई मंदीराकडे जाणाऱ्या रोडवरील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी 29 रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याने याबाबतची माहिती सरपंच उमेश मोहिते यांना दिली. त्यानंतर वनविभागाला याबाबतची माहिती कळवण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडणार इतक्यात बिबट्याने बाहेर येत धूम ठोकली. याबाबत अधिक … Read more

अखेर देऊर तलावातील पाणीपुरवठा विहीर झाली कार्यान्वित

Water News 20240328 131019 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागावर ‘दुष्काळी’ हा शिक्का कायमच बसला असून, या भागात सध्या 50 रुपये प्रतिबॅरल या दराने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या परिस्थितीत देऊर ग्रामपंचायतीने तळहिरा पाझर तलावातील विहिरीचे 2016 पासून रखडलेले काम पूर्ण करून, गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे देऊरकरांची तहान भागवण्यास मदत होणार आहे. जिल्हा … Read more

अदानींच्या वीज प्रकल्‍प रद्द मागणीसाठी प्रकल्पग्रस्त थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

Tarale News 20240327 121432 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | तारळे ता. पाटण येथे मंगळवारी प्रकल्पबाधित व श्रमिक मुक्ती दलाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी अदानी यांच्या वीज निर्मितीच्या प्रकल्पास विरोध दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. त्यापूर्वी मेळावा घेणार असल्याची घोषणा डॉ. पाटणकर यांनी यावेळी केली. तारळे येथील मेळाव्यातून डॉ. पाटणकर म्हणाले … Read more

गारवडे गावच्या शिवारात गवारेडयाचा ओढ्यात पडून मृत्यू

Patan News 14 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील गारवडे येथील आकुरीच्या शिवारात ओड्याकडे पाणी पिण्यासाठी जात असताना तोंडावर पडून गवा रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाटण तालुक्यातील बहुले वनपरक्षेत्राच्या डोंगराला गेल्या आठवड्यापासून लागलेल्या आगीमुळे डोंगरातील वन्यजीव प्राणी डोंगरातून खाली शेती शिवारात जीव वाचवण्यासाठी, अन्न पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी गारवडे येथील आकोरीच्या शिवारात ओढ्‌यात एक गवा … Read more

सर्वांत जास्त ऊस गाळपात जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याने मिळवला दुसरा क्रमांक

Satara News 20240326 092917 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यातील सर्वांत जास्त उसाचे गाळप करण्याचा मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती अॅग्रो प्रा. लि. या कारखान्याने १८ मार्च अखेर मिळवला असून या कारखान्याने तब्बल २१ लाख ३५ हजार ७२१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या साखर कारखान्याने १८ … Read more

कोचरेवाडीत भीषण आगीत 8 गवताच्या गंजी खाक; 3 शेतकऱ्यांचे 1 लाख 35 हजारचे नुकसान

Patan News 13 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या कोचरेवाडी येथील आठ गंजींना भीषण आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या आगीमध्ये 3 शेतकऱ्यांचे सुमारे 1 लाख 35 हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यापासून सुमारे 32 किमी अंतरावर डोंगरमाथ्यावर कोचरेवाडी हे गाव वसले आहे. गावात साधारण 109 कुटुंबे राहतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने … Read more

येरळवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रात उपसा बंदी, सिंचन विभागाने जप्त केल्या 18 विद्युत मोटारी

Yeralwadi Dam News jpg

सातारा प्रतिनिधी | सध्या खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत येरळवाडी धरण डेड स्टॉकवर अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा बंदी करण्यात आली आहे. तरीही काहीजण राजरोसपणे मोटारींच्या साहाय्याने रात्री पाणी उपसा करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. संबंधितांना सूचना देऊनही उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी … Read more

वाई पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत बांबू लागवड केलेल्या शेतीची पाहणी

Farmer News jpg

सातारा प्रतिनिधी । महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाचे माध्यमातून तालुक्यातील लगडवाडी येथील शेतकरी शरद मोरे यांच्या वतीने बांबू लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शरद मोरे यांना मजुरीच्या रूपाने सहा महिन्यांमध्ये ४५ हजार रुपये इतके मजुरी मिळाली. संबंधित शेतकऱ्याच्या बांबू लागवड केलेल्या या ठिकाणची वाई पंचायत समितीची कृषी विभागाचे विस्तार … Read more

अन् पाणी प्रश्नासाठी सुरु केलेले उपोषण पुसेसावळीतील ग्रामस्थांनी घेतले मागे

Pusesavali News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह परिसरात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने पुसेसावळी ग्रामस्थांनी वडूज येथे बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र, प्रशासनाच्या लेखी व सकारात्मक आश्वासनानंतर एका दिवसात हे उपोषण मागे घेण्यात आले. प्रशासनाच्या निर्णयानंतर या परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जनावराच्या पिण्याचा व चाऱ्याचा उपलब्धतेसाठी … Read more

शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : डॉ. पी. जी. पाटील

20240324 104339 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बोरगाव, ता. सातारा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समिती बैठक (दि. 22) उत्साहात पार पडली. बैठकीत “आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी जलसंधारणावर भर द्यावा,” असे मत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी … Read more