हळद पीक जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

Turmeric Crop News

सातारा प्रतिनिधी । जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व प्रकल्प संचालक, आत्मा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात एक दिवसीय हळद पीक जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Read more

कासवर आता वनविभाग अन् समितीकडून रात्रीचाही राहणार खडा पहारा

Kas News

सातारा प्रतिनिधी | जागतिक निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रंगाची फुलाचीउधळन करणाऱ्या कास पठारावर मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदा आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी देखील असल्याने याठिकाणी रात्रीच्यावेळी शिकारीचे प्रकार घडत असून यावर आता लक्ष ठेवण्यासाठी कास पठार कार्यकारी समिती आणि वन विभागाच्या वतीने रात्रीच्यावेळी रात्रगस्त घातली जात आहे. कास पठार कार्यकारी समिती कर्मचारी व रोहोटचे वनपाल … Read more

1 रुपयात ज्वारीला हेक्टरी 26 तर गव्हाला 30 हजार रुपये मदत; जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांचा सहभाग

Agri News

सातारा प्रतिनिधी । आपण लावलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी राज्य शासनाने पीक विमा योजना सुरू केली आहे. आताच्या रब्बी हंगामासाठीही एक रुपया भरुन सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. कारण नुकसानीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्याला ज्वारीसाठी हेक्टरी २६ तर गव्हासाठी ३० हजारांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे साडे आठ हजार शेतकऱ्यांनी एक … Read more

कराडच्या घोगावात बिबट्याचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला, 13 मेंढ्या जागीच ठार

Karad News 6 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील घोगाव येथील पाटीलमळी शिवारात मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून यामध्ये १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. यात मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, शेतीसाठी खत व्हावे या उद्देश्याने कराड तालुक्यातील घोगावातील पाटील मळी शिवारात एका शेतकऱ्याने मेंढ्या बसवल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या … Read more

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रब्बी हंगामातील 5 पिकांसाठी कृषी विभागाकडून स्पर्धा अन् 50 हजारांचे बक्षीस

Farmar News

सातारा प्रतिनिधी । पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने यावर्षीही रब्बी हंगामात जिल्ह्यातील पाच पिकांसाठी स्पर्धा घेण्यात आलेली आहे. यामुळे विजेत्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत पीक उत्पादनवाढीची शर्यत लागल्याने जोमदार पिके आलेलीही पाहावयास मिळणार आहेत. शेतकऱ्यांकडून भरघोस पीक उत्पादना वाढविण्यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात. यातून पीक उत्पादकतेत वाढ होते. अशा … Read more

सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त पुसेगावात ‘इतके’ दिवस भरणार बैलबाजार

Pusegaon News

सातारा प्रतिनिधी | सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त दि. २४ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत बैलबाजाराचे आयोजन केले आहे. जातिवंत खिलार जनावरांसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा बैलबाजार यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रस्टच्यावतीने भरवण्यात येणार आहे. पुसेगावच्या बैलबाजाराला मोठी परंपरा आहे. याठिकाणी येणारे बैल जातिवंत असतात, अशी ख्याती आहे. दरम्यान, हा बैलबाजार बारा दिवस भरवण्यात येणार असल्याने राज्यातील … Read more

‘कृष्णा’ करणार 1 कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती; पहिला टँकर झाला रवाना

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । कृष्णा कारखान्यात या गळीत हंगामात शुगर सिरपपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून टँकर ऑईल कंपनीकडे नुकताच रवाना झाला.या वर्षीही कृष्णा कारखान्याने १ कोटी लिटर्स इथेनॉलची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, … Read more

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल 3200 रूपये जाहीर

Karad News 20241212 211706 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने सन २०२४-२५ या ऊसगाळप हंगामासाठी येणार्‍या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी … Read more

उंडाळे नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा; कराडात आ. डॉ. भोसलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

Karad News 1 3

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणमधील डोंगरी भागातील गावांसाठी राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु केली. पण सातत्याने उद्‌भवणाऱ्या विविध अडचणींमुळे ही योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित नाही. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणच्या डोंगरी भागासाठी वरदायिनी ठरलेल्या उंडाळे प्रादेशिक पाणी योजनेसंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आज आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी … Read more

बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटलांनी शेतकऱ्यांना ऊसदराबाबत केले महत्वाचे आवाहन

Karad News

कराड प्रतिनिधी । शेतकरी बंधुनो घरात बसून ऊसाला दर मिळणार नाही. गेल्या दहा वर्षात ऊस दरासाठी आंदोलन झाले नसल्यामुळे उसाला दहा वर्षांत वाढीव दर मिळालेला नाही. त्यासाठी घरातून बाहेर पडा आणि घामाचा दाम घेण्यासाठी रस्त्यावर या सध्या साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडलेले आहेत याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. आता सर्वांना बाहेर पडून … Read more

सातारा ZP च्या 30 तलावात महिला करणार मासेमारी; महाराष्ट्रातील पहिलीच योजना

Satara News 20241212 114814 0000

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने उमेद अंतर्गत महिलाच्या बचत गटांना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 30 पाझर तलाव देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 30 महिला बचत गटातील महिला या 30 पाझर तलावामध्ये मत्स्य पालन करून आता चांगला फायदा मिळवू शकणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून राज्यातील … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्यांना तब्बल 57 कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान

Satara News 20241212 082857 0000

सातारा प्रतिनिधी | शासनाने जाहीर केलेल्या गायीच्या दुधाच्या अनुदानाचे साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ही अनुदानाची रक्कम १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीतील आहे. याशिवाय शेतकऱ्यांना एक ऑक्टोबर २०२४पासून दूध अनुदानात वाढ झालेल्या दोन रुपयांचे वाढीव एक कोटी रुपयेही मिळणार आहेत. पशुखाद्याचे दर वाढल्याने पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले आहे. त्यामुळे … Read more